शीतल टाईम्स । - राज्यभरातील शिक्षकांचे काळ्या फिती लावून निषेध आंदोलन ; हजारो शिक्षकांचा सहभाग शीतल टाईम्स प्रतिनिधी । श्रीरामपुर
राज्यभरातील शिक्षकांचे काळ्या फिती लावून निषेध आंदोलन ; हजारो शिक्षकांचा सहभाग
शीतल टाईम्स प्रतिनिधी । श्रीरामपुर
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या कार्यकर्त्यांनी व अनेक शिक्षकांनी शाळांमधून काळ्या फिती लावून ३३मागण्यांसाठी सतत प्रयत्नशील असूनही मागण्या मान्य न झाल्यामुळे आज राज्यात सर्वत्र काळ्या फिती लावून निषेध आंदोलन केले. जे शिक्षक घरी अध्यापन करत आहेत, त्यांनी घरातून काळी फित लावून आंदोलनात सहभाग घेतला.
शासनाने या मागण्यांची तात्काळ दखल न घेतल्यास राज्य स्तरावर तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल,असा इशाराही या निवेदनाच्या निमित्ताने देण्यात आलेले आहे. या मागण्यांमध्ये जुनी पेंशन योजना लागू करणे, आश्वासित प्रगती योजना लागू करणे, कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करा, वरिष्ट निवडश्रेणीचा विषय तात्काळ मार्गी लावा,अश्वासित प्रगती योजना लागू करा, आय. सी. टी. शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावणे, सातव्या वेतन आयोगाची थकबाकी त्वरित देणे, रात्र शाळांचे प्रश्न मार्गी लावणे यासारख्या ३३ मागण्या शासनाकडे मांडल्या असून त्याची तात्काळ दखल घ्यावी असे
अहमदनगर शिक्षक परिषदेचे कार्यवाह शशिकांत थोरात यांनी सांगितले की प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यामुळे आज राज्यात सर्वत्र काळ्या फिती लावून निषेध आंदोलन केले.
शिक्षक परिषदेच्या पदाधिकार्यांनी तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे यांना मागण्यांचे निवेदन जिल्हा कार्यवाह श्री.शशिकांत थोरात,तालुका प्रमुख सर्जेराव चव्हाण, संजय भिसे, बाबासाहेब थोरात, साहेबराव रक्टे, लालझरे, भारत वारुळे, काळे सर, प्रकाश भालेकर, यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच या मागण्या शासनाकडे पाठवण्याची विनंती केली.
शासनाने या मागण्यांची तात्काळ दखल न घेतल्यास राज्य स्तरावर तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल,असा इशारा शिक्षक परिषदेचे कार्यवाह शशिकांत थोरात सर यांनी दिला आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा