शीतल टाईम्स । - डॉ राजीव डोंगरे यांचे मार्गदर्शन मोलाचे... डॉ.संगीता डावखर सहा.आयुक्त समाज कल्याण. शीतल टाईम्स । शिरसगाव प्रतिनिधी

 डॉ राजीव डोंगरे यांचे मार्गदर्शन मोलाचे...

डॉ.संगीता डावखर सहा.आयुक्त समाज कल्याण.

 शीतल टाईम्स । शिरसगाव प्रतिनिधी 

     प्रख्यात हृदयरोगतज्ञ डॉ राजीव डोंगरे यांचे डेल्टा प्लस व्हे.या आजारावरील मार्गदर्शन मोलाचे आहे असे प्रतिपादन सहा.समाज कल्याण व न्याय विभाग पुणे यांनी केले.

    शुक्रवारी सायंकाळी गुगल मिट या कार्यक्रमात डेल्टा प्लस आजारावर प्रख्यात हृदय रोग तज्ञ डॉ राजीव डोंगरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.सध्या कोरोना,म्युकरमायकोसीस व नंतर आता सर्वत्र डेल्टा प्लस व्हेरीयेंट या आज्राराचा प्रादुर्भाव वाढत असून त्याचा उगम कसा झाला.त्याची सविस्तर माहिती सांगून प्रत्येकाने स्वत:ची सुरक्षा कशी करावी,व या आजाराला घाबरून न जाता वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घेऊन आजारावर मात करावी. जनतेत मोठ्या प्रमाणात शासनाने जनजागृती करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन गुगल मिट व्दारे ऑनलाईन कार्यक्रमात केले.आता तर झिन्का नवीन आजार येतोय. .या कार्यक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट गावाचा पुरस्कार व मराठवाडा विद्यापीठ व अमरावती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन गौरव पुरस्कार प्राप्त,व २ वेळा राष्ट्रपती पुरस्कार एपीजे अब्दुल कलाम व प्रतिभा पाटील यांच्या हस्ते प्राप्त,आदर्श सरपंच पुरस्कार मिळालेले भास्करराव पेरे पाटोदा यांच्या हस्ते करण्यात आला.भास्करराव पेरे म्हणाले की ग्रामीण भागात कोरोनाप्रमाणे डेल्टा प्लस या आजाराची जनजागृती व्हायला पाहिजे,शासन व सामाजिक संस्था यांचेमार्फत वैद्यकीय सहकार्य व्हावे.अध्यक्षस्थानी दक्षिण आफ्रिका मोरोक्को येथील आयुष मंत्रालय मान्यताप्राप्त योगा प्रशिक्षक रचना फासाटे यांनी कोरोना सारखे डेल्टा प्लस इतर आजारावर मात करण्यासाठी प्राणायाम व्दारे प्रतिकार शक्ती कशी वाढते आदी सविस्तर माहिती दिली.

   त्या अनेक शिबिरातून जगात योगा,प्राणायाम द्वारे जनजागृती करतात.भूमी फौंडेशन मार्फत अनेक सामाजिक विकासाचे अनेक उपक्रम राबविले आहेत.डॉ बाबुराव उपाध्ये यांनी यावेळी कविता सादर केली.कृषीकुल निराधार आश्रम उभारणीचा मानस आहे.तरी दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन या कामी सहकार्य करावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष प्रा.कैलास पवार यांनी केले आहे.गुगल मिट कार्यक्रमात सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व सामाजिक न्याय पुणे.डॉ संगीता डावखर डॉ रुपेश भोरटक्के,संस्था मार्गदर्शक प्राचार्य टी इ शेळके,डॉ बाबुराव उपाध्ये,डॉ बाळासाहेब मुरादे,डॉ शैलेंद्र भणगे,जेष्ठ पत्रकार बी आर चेडे,आरोग्यमित्र भीमराज बागुल,प्रा.शिवाजीराव बारगळ,डॉ अंजली जोशी पुणे,योगिता रांधावणे,नगर,नाम फौंडेशन सचिव शिंदे,चारीटी इन्स्पेक्टर महाराष्ट्र शासन रवींद्र गव्हाणे,प्राचार्य डॉ पांडुरंग गायकवाड,डॉ वानखेडे,अशोक त्रिभुवन आदी सहभागी होते.आभार प्रदर्शन संस्थेचे भीमराज बागुल यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव