शीतल टाईम्स । - बेलापूर शौचालय अतिक्रमण प्रश्नावरील आंदोलन स्थगित शीतल टाईम्स । बेलापूर प्रतिनिधी
शीतल टाईम्स । प्रतिनिधी
बेलापूर शौचालय अतिक्रमण प्रश्नावरील आंदोलन स्थगित
शीतल टाईम्स । बेलापूर प्रतिनिधी
येथील शिवनेरी गल्लीतील सार्वजनिक महिला शौचालय परिसरातील अतिक्रमण एक महिन्यात काढण्याचे लेखी आश्वासन ग्रामपंचायत प्रशासनाने दिल्यानंतर संबंधितांनी याप्रश्नी आयोजित केलेले उपोषण स्थगित केले.
बेलापूर येथील शिवनेरी गल्ली परिसरातील महिलांसाठी सामुदायिक शौचालय आहे. तथापि शौचालय परिसरात काही अतिक्रमण झाल्याने महिलांची गैरसोय होते. तेव्हा सदरचे अतिक्रमण हटवावे अशी मागणी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. अनेक वर्षापासूनचा सदरचा प्रश्न मार्गी लावावा यासाठी महिलांनी सोमवार दिनांक २ ऑगस्ट रोजी उपोषणाचा इशारा दिला होता.
याप्रश्नी मार्ग काढण्यासाठी ज्येष्ठ नेते सुनिल मुथा यांनी मध्यस्थी करुन संबंधितांना बोलावून त्यांची सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांचेशी चर्चा घडवून आणली. तसेच जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी देखील चर्चा करून वास्तविक परिस्थिती समजून सांगितली. आपली मागणी रास्त असून त्यादृष्टीने कार्यवाही सुरु करण्यात आली आहे येत्या आठ दहा दिवसात मोजणी होवून लाईन आऊट केली जाणार आहे. त्यानंतर अतिक्रमण काढणेबाबत कारवाई करण्यात येणार असल्याचे सरपंच महेन्द्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी स्पष्ट केले.
ग्रामपंचायत प्रशासनाने एक महिन्यात अतिक्रमण काढण्याचे मान्य केल्याने आपण उपोषण मागे घ्यावे असे सुनिल मुथा यांनी सांगीतले. लेखी आश्वासनानंतर संबंधितांनी याप्रश्नी आयोजित उपोषण स्थगित केले.
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा