शीतल टाईम्स । बेलापूर प्रतिनिधी अल्पवयीन मुलीला पळवून नेलेल्या आरोपीस शोधण्यासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

     




शीतल टाईम्स । बेलापूर प्रतिनिधी 

अल्पवयीन मुलीला पळवून नेलेल्या आरोपीस शोधण्यासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद 


बेलापुर  (प्रतिनिधी  )-येथील अल्पवयीन मुलीचा अद्यापही शोध न लागल्याच्या निषेधार्थ शिवप्रहार संघटनेने पुकारलेल्या बंदला बेलापूरात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. सर्व व्यापारी बांधवांनी स्वेच्छेने आपापली दुकाने बंद ठेवली.

     येथील अल्पवयीन मुलीचा अजुन तरी पोलीसांना ठावठिकाणा लागलेला नाही. पोलीसांना वेळोवेळी निवेदने दिली रस्ता रोको केला. तरीही पोलीसांना त्या अल्पवयीन मुलीस फुस लावणाऱ्यास पकडता आलेले नाही. त्यामुळे आपल्या मुलीचे काही बरे वाईट तर झाले नसेल ना? अशी शंका नातेवाईकांना येत आहे. पोलीस केवळ अश्वासने देत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ शिवप्रहार संघटनेच्या वतीने बंदचे अवाहन करण्यात आले होते. याअवाहनाला सर्व व्यापारी नागरीक बंधुनी चांगला प्रतिसाद दिला. सर्वांनी स्वेच्छेने आपले व्यवहार बंद ठेवले. लॉक डाऊन मुळे सर्व व्यवहार बंद होते. आज पासुन शासनाने वेळेची मर्यादा वाढविली असली तरी घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असल्यामुळे सर्वानी दुकाने बंद ठेवुन या घटनेचा निषेध नोंदविला आहे.

  पोलीस उपनिरीक्षक कृष्णा धायवट, हवालदार अतुल लोटके, पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे, गणेश भिंगारदे, पोपट भोईटे, निखील तमनर, हरिष पानसंबळ आदिंनी चोख बंदोबस्त ठेवला.





******************************************************
******************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

नियमित वाचा - बातम्या व जाहिरातीसाठी
 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

*******************************************************
*******************************************************




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव