शीतल टाईम्स । - बेपत्ता अल्पवयीन मुलीचा शोध न लागल्याने पालकांचा जीव टांगणीला शीतल टाईम्स । बेलापुर प्रतिनिधी

  



शीतल टाईम्स । प्रतिनिधी

बेपत्ता अल्पवयीन मुलीचा शोध न लागल्याने पालकांचा जीव टांगणीला

शीतल टाईम्स  । बेलापुर प्रतिनिधी 

  गावातून एका अल्पवयीन मुलीला फुस लावुन पळवुन नेण्याच्या घटनेला आज दहा दिवस उलटून गेले असुन अजुनही त्या मुलीचा शोध न लागल्यामुळे पालकांचा जिव टांगणीला लागला आहे.

     येथील मोल मजुरी करणाऱ्या कुटुंबातील एक अल्पवयीन मुलगी २३ जुलै रोजी दुपारी घरातुन निघुन गेली होती. या बाबत मुलीच्या आईने मुलीला कुणीतरी अज्ञात इसमाने फुस लावुन पळवुन नेल्याची फिर्याद बेलापुर पोलीस स्टेशनला दिलेली आहे मुलीच्या आईच्या तक्रारी  वरुन पोलीसांनी अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा राजि . नंबर I ४९३/२०२१ भा द वि कायदा कलम ३६३प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे ज्या दिवशी ही मुलगी घरातून गेली त्याच दिवशी गावातील एक तरुणही घरातून पैसे घेवुन गायब झालेला आहे. पोलीस या दोघांचाही शोध घेत आहे परंतु त्यांचा कोठेही ठावठिकाणा लागलेला नाही मुलीचे नातेवाईकही सर्वत्र मुलीचा शोध घेत आहे तसेच पोलीसही आरोपीच्या मागावर आहेत. लवकरच मुलीला पालकाच्या ताब्यात देवू असा विश्वास पोलीसांना आहे. या बाबत पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील हे पुढील तपास करत आहे.




******************************************************
******************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

नियमित वाचा - बातम्या व जाहिरातीसाठी
 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

*******************************************************
*******************************************************




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव