शीतल टाईम्स । - संत शिरोमणी सावता महाराज यांचा संजीवन समाधी पुण्यतिथी सोहळा संपन्न शीतल टाईम्स । बेलापूर प्रतिनिधी
शीतल टाईम्स ।
संत शिरोमणी सावता महाराज यांचा संजीवन समाधी पुण्यतिथी सोहळा संपन्न
शीतल टाईम्स । बेलापूर प्रतिनिधी
संपूर्ण विश्वाला श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व सांगणारे संत शिरोमणी सावता महाराज यांचा ७२६ वा संजीवन समाधी पुण्यतिथी सोहळा बेलापूर येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
यावेळी सागर कुऱ्हे व सौ.कुऱ्हे यांच्या हस्ते श्री संत सावता महाराज यांच्या मुर्तीस अभिषेक घालण्यात आला. दरवर्षी होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताह, किर्तने, प्रवचने, अन्नदान, महाआरती आदी कार्यक्रमांना फाटा देऊन, साध्या पद्धतीने सप्ताहभर मोजक्या उपस्थितीमध्ये, सकाळची पूजा व सायंकाळी हरिपाठ करण्यात येऊन सातव्यादिवशी विधीवत पूजा करून भजन, किर्तनाने सप्ताहाची सांगता करण्यात आली.
याप्रसंगी हभप संजय महाराज शिरसाठ, हभप बबन महाराज अनाप, उपसरपंच अभिषेक खंडागळे, सोपान हिरवे, एकनाथ रोकडे, बडाखबाई, जिजाबाई शिंदे, भास्कर कुऱ्हे, दत्तू जाधव, श्याम मेहेत्रे, खळेकर, सोमनाथ शिरसाठ, रामनाथ शिंदे, जालिंदर कुऱ्हे, विलास मेहेत्रे, प्रकाश कुऱ्हे, राजेंद्र सातभाई, प्रभाकर कुऱ्हे, एकनाथ दुधाळ, सागर कुऱ्हे, अर्जुन कुऱ्हे, तुकाराम मेहत्रे, गोरखनाथ कुऱ्हे, रघुनाथ जाधव, ऋषिकेश कुऱ्हे, दत्ता कुऱ्हे, बाळासाहेब लगे, राजेंद्र टेकडे, गोविंद साळुंके, संदीप कुऱ्हे, वैभव कुऱ्हे, कृष्णा भागवत, साहिल कुऱ्हे, सावकार ताम्हाणे, रमेश लगे, अशोक दुधाळ, महेश कुऱ्हे, प्रफुल्ल कुऱ्हे आदी समाज बांधव उपस्थित होते.





टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा