शीतल टाईम्स । प्रतिनिधी श्रीवेद देसाई बालशौर्य पुरस्काराने सन्मानीत पोलिस प्रशासनाच्या वतीने लवकरच सन्मान करणार - डॉ दिपालीताई काळे
शीतल टाईम्स । प्रतिनिधी
श्रीवेद देसाई बालशौर्य पुरस्काराने सन्मानीत
पोलिस प्रशासनाच्या वतीने लवकरच सन्मान करणार - डॉ दिपालीताई काळे
श्रीरामपूर प्रतिनिधी ।- तालुक्यातील वडाळा महादेव येथील श्रीवेद राजेन्द्र देसाई या शालेय विद्यार्थ्यांचे मानवता जीवन कल्याण सेवाभावी संस्थेच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक माननीय डॉ दिपाली ताई काळे यांच्या हस्ते नुकताच बालशौर्य पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सदर विद्यार्थ्यास सन्मानीत करण्यात आले.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अप्पर पोलीस अधीक्षक माननीय डॉ दीपालीताई काळे यांनी श्रीवेद देसाई या विद्यार्थ्यांनी प्रसंगावधान राखत स्वतःचा जीव धोक्यात घालून एका लहान बालकाचा प्राण वाचविला आहे तरी याबद्दल पोलिस प्रशासनाच्या वतीने लवकरच श्रीवेद याचा सन्मान करण्यात येईल असे सांगितले.
तसेच विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अध्ययन करावे यामुळे यशप्राप्ती नक्कीच होते तसेच येथील मानवता जीवन कल्याण सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून श्रीवेद देसाई या तरुणास भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल साळवे उपाध्यक्ष अँड दादासाहेब निघुट उद्योजक श्री सुनील कर्जतकर श्री कसार रेव्ह राजेश कर्डक, वर्ल्ड पार्लमेंट - महाराष्ट्र ( श्रीरामपूर चॅप्टर ) अध्यक्ष डॉ दत्ता विघावे, इंजिनीयर अविनाश काळे अँड प्रमोद सगळगिळे, प्रा नानासाहेब गांगड, प्रा विजय साळवे अजय शिंदे, जितेंद्र पाटील, पत्रकार राजेंद्र देसाई राजेंद्र गायकवाड, अँड विनोद तोरणे, गजानन पंडित पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ बनकर, दत्तात्रय साबळे, पोलीस अधिकारी नितीन भालेराव, गोविंदराव राऊत, किरण कुदळे, अभियंता भरत गिरी, बाबासाहेब थोरात, राजेंद्र हिवाळे, विनोद चोरडिया उदय गदिया, विनोद कुकरेजा, संतोष गायकवाड, प्रा. जगदीश बनसोडे, प्रा दादासाहेब कर्णे ,संदीप वाघमारे, नितीन राऊत, प्रमोद तोरणे, देविदास दळवी, अशोक भोसले, मनोज पठारे, मयुर कोठारी, निर्मल इनामके, पी एस निकम, बाळासाहेब भोसले, बाळकृष्ण कांबळे, रवी हरार, अमोल पंडित, ज्ञानेश सारंगधर ,संजय त्रिभुवन, तानाजी पाटील आदी उपस्थित होते यावेळी उपस्थित सर्वांचे अध्यक्ष अनिल साळवे यांनी आभार मानले.




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा