शीतल टाईम्स - साई संस्थानच्या विश्वस्त निवडीमध्ये बेलापूरकरांची उपेक्षा

      


साई संस्थानच्या विश्वस्त 

निवडीमध्ये बेलापूरकरांची 

उपेक्षा 

शीतल टाईम्स । प्रतिनिधी


शीतल टाईम्स । बेलापूर प्रतिनिधी

साई संस्थानच्या विश्वस्त 

निवडीमध्ये बेलापूरकरांची 

उपेक्षा 


शासनाने साई संस्थानच्या १२ विश्वस्तांच्या नावाची यादी जाहिर करताना बेलापूरकरांची निराशा केली आहे. बेलापूरसारख्या शहरवजा गावात अनेक पात्र व निकषपूर्ती करणाऱ्या व्यक्ती असून बेलापूरकरांची आजवर उपेक्षाच झाल्याची प्ररतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त केलीजात आहे.



शासनाने नुकतीच साई संस्थानच्या बारा विश्वस्तांची यादी जाहिर केली आहे.सदर यादीत खरे तर बेलापूरातील नाव ग्रामस्थांन अपेक्षित होते. विश्वस्त पदासाठी जे निकष आहे त्याची पूर्तता करणाऱ्या अनेक व्यक्ती व नेते बेलापूरात आहेत.यादितील कोणाच्याही निवडीबद्दल आक्षेप नसला तरी बेलापूरला डावलल्याची भावना  ग्रामस्थांमध्ये आहे.


बेलापूर हे शहरवजा गाव आहे. या गावात अनेक नामांकीत नेते व निष्ठावंत कार्यकर्ते आहेत.सदर कार्यकर्ते पिढ्यान पिढ्या आपापल्या पक्षाचे निष्ठेने काम करतात. असे असताना महत्वाची पदे देताना बेलापूर माञ उपेक्षित राहाते. बेलापूरला  आजवर जि.परिषद, पं.समिती सभापती, मुळा प्रवरा वीज संस्था कृ.ऊ.बाजार समिती व अशोक कारखाना  या व्यतिरिक्त अन्य कोणतेही राज्यस्तरिय महत्वाचे महामंडळ, विश्वस्त संस्था, शासन समित्यांचे पदाची संधी मिळालेली नाही.



लहान खेड्यापाड्यातील व्यक्ती मंत्री, खासदार, आमदार होतात. त्याचवेळी बेलापूरसारखे जिल्यातील सर्वात मोठ्या गावाच्या पदरी उपेक्षा पडते असा अनुभव आहे. बेलापूरात विविध समाजाचे चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांच्या निष्ठांना व कतृत्वाला न्याय कधी मिळणार असा सवाल ग्रामस्थांकडून यांनी उपस्थित केला जात आहे. विश्वस्तपदाच्या आणखी पाच जागा रिक्त आहेत. त्यात तरी बेलापूरातील व्यक्तीला संधी मिळेल. अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



******************************************************
******************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

नियमित वाचा - बातम्या व जाहिरातीसाठी
 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

******************************************************
******************************************************




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव