शीतल टाईम्स । प्रतिनिधी भाषा हे राष्ट्र व समाज निर्मितीच्या समृद्धीचे प्रतीक - डॉ.जिभाऊ मोरे

      


शीतल टाईम्स । प्रतिनिधी



शीतल टाईम्स । प्रतिनिधी

भाषा हे राष्ट्र व समाज 

निर्मितीच्या समृद्धीचे प्रतीक 

- डॉ.जिभाऊ मोरे

शीतल टाईम्स 

बेलापूर (प्रतिनिधी) - भाषा कुठल्याही राष्ट्र व समाज निर्मितीच्या समृद्धीचे प्रतीक असते. कोणतीही भाषा आपल्या मुळ स्वरुपात उच्च प्रतीची असते. भाषा केवळ एक मात्र साधन नसून ती एक जीवनावस्था आहे. त्यामुळे भाषेमध्ये बदलत्या काळानुरूप परिवर्तन केले आहे असे विचार के .जे. सोमय्या महाविद्यालय कोपरगाव येथील हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ. जिभाऊ मोरे यांनी व्यक्त केले. 


बेलापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने आयोजित राष्ट्रभाषा हिंदी दिनाच्या निमित्ताने आयोजित आॕनलाईन कार्यक्रमात ते बोलत होते. सदर कार्यक्रमात रा.ब.ना बोरावके महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. अनुप दळवी यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव ॲड. शरद सोमाणी हे होते. 


यावेळी संस्थेचे अध्यक्ष गणपतलालजी मुथा, सचिव दीपक सिकची हे उपस्थित होते. प्रा. डॉ. जिभाऊ मोरे पुढे म्हणाले की, हिंदी भाषेचा विकास करावयाचा असेल तर तिचा उपयोग प्रत्यक्षपणे व्यवहारांच्या वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर व्हावयास हवा तरच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला प्रगती साधता येईल. प्रा. डॉ. अनुपम दळवी म्हणाले की, हिंदी ही एक मात्र अशी भाषा आहे की देशातील विविध संस्कृतींना एकसंघ ठेवू शकते. त्यामुळे देशाची एकसंघ अखंडता कायम ठेवणे हे हिंदी भाषेचे एक मात्र मूळ वैशिष्ट्य आहे. म्हणून ती राष्ट्रभाषा म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करते.


या कार्यक्रमाची अध्यक्षीय सूचना प्रा. प्रकाश देशपांडे यांनी मांडली. प्रा. डॉ. अशोक माने यांनी अध्यक्षीय अनुमोदन दिले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे यांनी  कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन प्रमुख अतिथींचा परिचय करुन दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.बाळासाहेब बाचकर यांनी केले तर आभार हिंदी विभाग प्रमुख प्रा.निजाम शेख यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी प्राध्यापक व प्राध्यापक इतर सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



******************************************************
******************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

नियमित वाचा - बातम्या व जाहिरातीसाठी
 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

******************************************************
******************************************************




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव