शीतलटाईम्स - सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन बंदमध्ये शिथीलता द्यावी ; बेलापूरकरांची मागणी शीतलटाईम्स । बेलापुर (प्रतिनिधी)

  


    शीतल टाईम्स । श्रीरामपूर प्रतिनिधी



सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन बंदमध्ये शिथीलता द्यावी ; बेलापूरकरांची मागणी 


शीतलटाईम्स । बेलापुर (प्रतिनिधी)


बेलापुर खूर्द गावात सध्या फक्त एकच कोरोनाचा रुग्ण असुन तो ही रुग्ण दवाखान्यात उपचार घेत आहे. गावात लसीकरण ८०% पुर्ण झाले असुन सणा सुदीचे दिवस लक्षात घेता नागरीकांना बंद मध्ये शिथीलता द्यावी अशी मागणी बेलापुर खूर्दच्या ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी केली आहे.


 मा. जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनात ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी पुढे म्हटले आहे की गावात सध्या कोरोनाचा एकच रुग्ण आहे. सर्व नागरीकांचे आर टी पी सी आर टेस्ट व रॕपीड टेस्ट करुन घेण्यात आलेल्या आहेत. गावात लसीकरणाचे कामही चांगल्या प्रकारे झालेले आहे. तपासणी केलेले सर्व अहवाल हे निगेटीव्ह आलेले आहेत. गावातील कोरोना समीती अतिशय जागृकपणे काम करत असुन कोरोनाचा फैलाव होवू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेत आहे. 


गावात कोरोनाचे रुग्ण वाढु लागताच बेलापुर खूर्द ग्रामपंचायतीने आपणहून लॉकडाऊन सुरु केला होता. सर्व परिसर बंद केला होता. तेव्हापासून गावातील व्यापार बंद आहेत. सध्या कोरोना आटोक्यात आलेला असुन तसा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल देखील आहे. नवरात्रौ उत्सव दसरा सण तोंडावर आला असल्या कारणाने व्यापाऱ्यांनी कर्ज काढून, उसनवार करुन दुकानात माल भरुन ठेवलेला आहे. त्यामुळे दुकाने जास्त दिवसा बंद राहील्यास माल खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंदच्या नियमात शिथीलता द्यावी अशी मागणी ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


या निवेदनावर सर्वश्री ॲड दिपक बारहाते, महेश बडधे, चंद्रकांत मते, भाऊसाहेब पुजारी, राहुल गायकवाड, किशोर बोरुडे, हुसेन पठाण, योगेश वाघमोडे, रविंद्र पुजारी, नंदकिशोर कुऱ्हे, शरद म्हैस, सोमनाथ भागवत, रविंद्र महाडीक, प्रज्ञा रोकडे, रफीक सय्यद, मिलींद बडधे, दिपक महाडीक, रोहीणी राऊत, समीर सय्यद, प्रकाश रणदिवे, लखन भगत, विलास भालेराव, किरण पुजारी, मच्छिंद्र थोरात, सुनिल बडधे आदींच्या सह्या आहेत.


******************************************************
******************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

 - बातम्या व जाहिरातीसाठी

 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

*******************************************************
*******************************************************




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव