शीतलटाईम्स - राज्यात आठ तासांचे लोडशेडींग होण्याची शक्यता ! सहा औष्णिक वीज निर्मिती प्लांट कोळश्याअभावी बंद ! मुंबई : वृत्तसेवा
शीतल टाईम्स । वृत्तसेवा
राज्यात आठ तासांचे लोडशेडींग होण्याची शक्यता !
सहा औष्णिक वीज निर्मिती प्लांट कोळश्याअभावी बंद !
मुंबई : वृत्तसेवा
देशात कोळशाची कमतरता असून याचा फटका महाराष्ट्राला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, राज्यातील सहा औष्णिक वीज निर्मिती केंद्रातले प्लांट कोळश्याअभावी बंद करण्यात आले आहेत.
वीज तूट भरुन काढण्यासाठी कोयना आणि इतर 12 होयड्रो प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जर हीच परिस्थिती राहिली तर शहरी/ग्रामीण भागात आठ तासाचे लोडशेडींग करावे लागेल. त्यामुळे विजेचा अनावश्यक वापर कमी करा, अशी विनंती महावितरणने केली आहे. दरम्यान, देशात कोळशाची कमतरता आणि वीज संकटाच्या चर्चांवर सरकारने वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता निराधार असल्याचे म्हटले आहे.
राज्यात लोडशेडींगची शक्यता !
कोशळ्या कमतरता भासत असल्याचा परिणाम म्हणून आज राज्यातील सहा औष्णिक वीज निर्मिती केंद्रातले प्लांट बंद करण्यात आले आहे. विजेची तूट भरुन काढण्यासाठी कोयना आणि इतर 12 होयड्रो प्रकल्प हे पुर्ण क्षमतेने चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विज निर्मितीची भरपाई होईल. या प्रकल्पातून 60 टक्के तुट भरून निघणार असल्याची माहिती महावितरण कंपनीने दिली आहे. जर हीच परिस्थिती राहिली शहरी आणि ग्रामीण भागात आठ तासाचे लोडशेडींग करावे लागणार आहे.
वीज संकटाच्या बातम्या निराधार ! ; केंद्र सरकार
देशात कोळशाची कमतरता आणि वीज संकटाच्या चर्चांवर सरकारने वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता निराधार असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, त्यांनी देशातील कोळसा उत्पादन आणि पुरवठा परिस्थितीचा आढावा घेतला आहे. ते म्हणाले की, ते सर्व देशवासियांना आश्वास्त करतायेत की देशातील वीज पुरवठा खंडित होण्याचा कोणताही धोका नाही.
******************************************************
******************************************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******
******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******
- बातम्या व जाहिरातीसाठी
************-संपर्क-*************
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********** मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********** मो. 9273729867
*******************************************************
*******************************************************


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा