शीतलटाईम्स - लखीमपुर येथील घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला बेलापुरात चांगला प्रतिसाद शीतलटाईम्स । बेलापुर (प्रतिनिधी)

  


    शीतल टाईम्स । प्रतिनिधी




लखीमपुर येथील घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला बेलापुरात चांगला प्रतिसाद


शीतलटाईम्स । बेलापुर  (प्रतिनिधी)


लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास अघाडीने पुकारलेल्या बंदला बेलापुर गावात चांगला प्रतिसाद मिळाला.


महाविकास अघाडीच्या वतीने पुकारलेल्या बंदला बेलापूरातील व्यापारी बाधवांनी चांगला प्रतिसाद दिला. भाजपाने या बंदमध्ये सहभागी न होण्याचे अवाहन व्यापार्यांना केले होते, परंतु व्यापाऱ्यांनी ते धुडकावत बंदमध्ये सहभागी होवुन आपला निषेध नोंदविला. काल दिवसभर बेलापूरच्या वेगवेगळ्या व्हाटस्अप गृपवर बंद विषयी अवाहन प्रतिअवाहन चालू होते. भाजपने व्यापाऱ्यांना बंदमध्ये सामील न होण्याचे आवाहन केले होते. तर, महाविकास अघाडी तसेच शेतकरी संघटनांनी बंदमध्ये सहभागी होण्याचे अवाहन व्यापाऱ्यांना केले होते, त्यामुळे बेलापुरची बाजारपेठ काही दुकाने वगळता पुर्णपणे बंद होती. भाजीपाला तसेच फळ विक्रेत्यांची दुकाने मात्र सुरु होती.



 या वेळी शेतकरी संघटनेचे नेते सुधाकर खंडागळे पचायत समीती सदस्य अरुण पा नाईक, बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, शिवसेनेचे आशोक पवार यांनी व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवल्याबद्दल व्यापाऱ्यांच आभार मानले.



यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरुण पाटील नाईक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, शेतकरी संघटनेचे सुधाकर खंडागळे, ज्ञानदेव वाबळे, शिवाजी वाबळे, प्रकाश नाईक, भास्कर बंगाळ, चंद्रकांत नाईक, गोविंद वाबळे, सोसायटीचे चेअरमन अनिल नाईक, भास्कर कोळसे, शिवसेना नेते अशोक पवार, नारायण मेहत्रे, दत्ता कुऱ्हे, शशिकांत कापसे, रमेश कुमावत आदी उपस्थित होते.


******************************************************
******************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

 - बातम्या व जाहिरातीसाठी

 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

*******************************************************
*******************************************************




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव