शीतलटाईम्स - मागासवर्गीय फंडातील १५% वार्षिक निधी वितरीत करण्यात यावा ; अन्यथा अमरण उपोषण करण्याचा इशारा शीतलटाईम्स । बेलापूर प्रतिनिधी

  


    शीतल टाईम्स । प्रतिनिधी





मागासवर्गीय फंडातील १५% वार्षिक निधी त्वरित वितरीत करण्यात यावा ; अन्यथा अमरण उपोषण करण्याचा इशारा 


शीतलटाईम्स । बेलापूर प्रतिनिधी 


बेलापूर बुदुक ग्रामपंचायतच्या वार्षिक उत्पन्नातून  मागासवर्गीय फंडातील १५% निधी मागासवर्गीयांना रोख स्वरूपात वितरित करण्यात यावा अन्यथा उपोषण करण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे. 


ग्राम विकास अधिकारी राजेंद्र तगरे यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की सन २०१९-२०२०, २०२०-२०२१ सालातील वार्षिक उत्पन्न अंदाजे ७० लाख असून, त्यानुसार दोन वर्षाचा दलित निधी सुमारे १४ लाख, दलित बांधवांना खर्च करणे अपेक्षित असताना तो खर्च केला नसून, दिनांक २७ मे २०२१ च्या पत्राचा संदर्भ देत पुढे म्हटले आहे की, आपल्याकडे वेळोवेळी मागणी करून आपण कारवाई केलेली नाही. कोरोना सारख्या माहामारीत गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे सदर निधीतून सणासुदीला या काळात रोख स्वरूपात सर्वांना आर्थिक मदत करावी. अन्यथा आपल्या कार्यालयासमोर दिनांक २२/१०/२०२१ रोजी सर्व ग्रामस्थांसह अमरण उपोषण करण्यात येईल. असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.


यावेळी पंचायत समिती सदस्य अरुण पाटील नाईक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, माजी सरपंच भरत साळुंके, माजी सदस्य अनिल पवार, जावेद शेख यांचेसह विजय शेलार, भाऊसाहेब तेलोरे, बाबासाहेब अमोलिक, विजय अमोलिक, विनोद अमोलिक, लुईस अमोलिक, दानियल खरात, गणेश अल्लाट लता तेलोरे, अनिता तेलोरे, उषा तेलोरे, प्रदीप शेलार, प्रसाद शेलार, सुभद्रा शेलार, रमेश शेलार, संजय शेलार, हिरण तेलोरे, सुशीला तेलोरे, सुंदर अमोलिक, सुनील जाधव, संदीप खरात, प्रकाश अमोलिक, राजेंद्र तेलोरे, सुनील अमोलिक, सचिन पारखे, नितीन खरात, मयूर खरात, महेश मिसाळ, वैशाली मिसाळ, जालिंदर मिसाळ, यशोदा मिसाळ, राहुल तेलोरे, नीलम तेलोरे, अनिता खरात, प्रकाश खरात, अशोक पवार, मंदा पवार, अजय पवार, विजय पवार, अमोल तेलोरे, पंकज रणदिवे, सनी पठारे आदि ग्रामस्थ उपस्थित होते.


******************************************************
******************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

 - बातम्या व जाहिरातीसाठी

 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

*******************************************************
*******************************************************




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव