शीतलटाईम्स - बेलापूर महाविद्यालयात बुधवारी साहित्य अकादमीच्या "ग्रामालोक" कार्यक्रमाचे आयोजन
बेलापूर महाविद्यालयात बुधवारी साहित्य अकादमीच्या "ग्रामालोक" कार्यक्रमाचे आयोजन
शीतल टाईम्स । बेलापूर प्रतिनिधी
येथील बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालय बेलापूर आणि साहित्य अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने "ग्रामालोक" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम बुधवार दि. 20 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी दहा वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे. या ग्रामालोक कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवर कवयित्री साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार समितीच्या सदस्या आणि शब्दालय प्रकाशनच्या सर्वेसर्वा सुमतीताई लांडे यांच्या शुभहस्ते होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गणपतलाल मुथ्था भुषवणार आहेत तर प्रमुख उपस्थितीत बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव अॅड.शरद सोमाणी, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन राजेश खटोड व मान्यवर पदाधिकारी असणार आहेत. कार्यक्रमामधे प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध ग्रामीण कवी यशवंत पुलाटे, उपजिल्हाधिकारी कवी गणेश मरकड, कवयित्री संगिता फासाटे आणि रिंगणकार कवयित्री माधुरी मरकड यांचे काव्यवाचन होणार आहे.
या कार्यक्रमात ग्रामीण कविता, बोलीभाषेतील कविता, प्रादेशिक संदर्भाच्या आशयसंपन्न कविता आणि स्रीजाणिवेच्या कवितांचे सादरीकरण होणार आहे.या कार्यक्रमासाठी पदाधिकारी व स्टाफ सामाजिक नियमांचे पालन करुन उपस्थित राहणार आहेत.साहित्य अकादमीच्या ग्रामालोक कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ गुंफा कोकाटे व साहित्य अकादमीचे ओमनागर यांनी केले आहे.
******************************************************
******************************************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******
******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******
- बातम्या व जाहिरातीसाठी
************-संपर्क-*************
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********** मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********** मो. 9273729867
*******************************************************
*******************************************************


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा