शीतलटाईम्स - मोहंमद पैगंबर यांच्या पवित्र केसांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी मोहंमद पैगंबर जयंती निमित्त टकटी दरवाजा येथे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न

   


मोहंमद पैगंबर यांच्या पवित्र केसांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

मोहंमद पैगंबर जयंती निमित्त टकटी दरवाजा येथे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न



    शीतल टाईम्स । अहमदनगर प्रतिनिधी

मोहंमद पैगंबर जयंती (ईद ए मिलाद) निमित्त सालाबाद प्रमाणे शहरातील टकटी दरवाजा (मीर मुर्तूजा टकटी दरवाजा महल) येथे मोहंमद पैगंबर यांचे पवित्र केसांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. तसेच यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले.


देशात सात ते आठ ठिकाणी हजरत मोहम्मद पैगंबर यांचे पवित्र केस आहे. यामध्ये अहमदनगर, औरंगाबाद, नागोर, बडीखाटू (राजस्थान), मध्यप्रदेश, काश्मीर आणि तुर्कस्तान देशातील आस्तंबूल या गावाचा समावेश आहे. 


नगरच्या मोघल कालीन इतिहासात हजरत महंमद पैगंबराच्या पवित्र केसांचा उल्लेख आलेला आहे. इराक व इराण बॉर्डरवर असलेले मशहद (शहिदांचे गाव) शहरातून हजरत मोहम्मद पैगंबराचे पवित्र केस आनले असून, परंपरेनुसार फक्त मोहंमद पैगंबर जयंतीच्या दिवशी हे पवित्र केस दर्शनासाठी खुले करण्यात येत असल्याची माहिती पुजारी सय्यद बुर्‍हाण यांनी दिली. यावेळी मीर मुर्तूजा टकटी दरवाजा महलला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, फुलांची सजावट करण्यात आली आहे. याच दिवशी नगर शहरातून झेंड्याची मिरवणुक काढण्यात येवून, ठिकठिकाणी प्रसादाचे वाटप झाले.


  • मोहंमद पैगंबर जयंती (ईद ए मिलाद) निमित्त शहरातील टकटी दरवाजा (मीर मुर्तूजा टकटी दरवाजा महल) येथे मोहंमद पैगंबर यांचे पवित्र केसाच्या दर्शनासाठी भाविकांची झालेली गर्दी. (छाया-साजिद शेख-नगर)

******************************************************
******************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

 - बातम्या व जाहिरातीसाठी

 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

******************************************************
******************************************************




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव