शीतलटाईम्स - पुरूष प्रधान संस्कृतीने महीलांच्या अधिकारावर गदा - न्यायाधीश एन.के.खराडे शीतल टाईम्स । प्रतिनिधी गळनिंब
शीतल टाईम्स । प्रतिनिधी
पुरूष प्रधान संस्कृतीने महीलांच्या अधिकारावर गदा - न्यायाधीश एन.के.खराडे
शीतल टाईम्स । प्रतिनिधी गळनिंब
पुरूषांनी स्वत: कमावलेल्या प्राॅपर्टीमध्येच स्वत:चा अधिकार परंतु वडिलांच्या प्राॅपर्टीमध्ये मुलाप्रमाणे मुलीचाही समान हक्क असून वंश परंपरेने चालत आलेल्या पुरूषप्रधान संस्कृतीने महीलांच्या अधिकारावर खर्या अर्थाने गदा आल्याचे प्रतिपादन श्रीरामपूर न्यायालयाचे सह दिवाणी न्यायाधीश मा.एन.के.खराडे साहेब यांनी गळनिंब, कुरणपूर, फत्याबाद येथे विधी सेवा समिती व वकील संघ श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित कायदेविषयक जनजागृती शिबिरा प्रसंगी केले.
यावेळी व्यासपीठावर श्रीरामपूर वकील संघाचे अॅड.आर.डी.भोसले, अॅड.आहेर, अॅड.पंकज म्हस्के, गळनिंबचे सरपंच शिवाजी चिंधे, कुरणपूरच्या सरपंच सौ.मनिषा पारखे, प्रवरा बॅंकेचे माजी संचालक हनुमान चिंधे आदी होते.
अॅड.पंकज म्हस्के यांनी मार्गदर्शन करताना समाजातील वृध्द,निराधार व अपंग व्यक्तींना सरकारच्या वतीने देण्यात येणार्या विविध योजनांचा लेखाजोखा मांडला. अॅड. आर. डी. भोसले यांनी विधी सेवा समितीच्या वतीने समाजातील घटकांना मोफत न्याय कसा देता येईल याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष कैलास चिंधे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्तविक व सुत्रसंचालन अॅड.रविंद्र हाळनोर यांनी केले.
यावेळी आण्णासाहेब शिंदे, साहेबराव भोसले, ज्ञानदेव जाटे, बापूसाहेब वडितके,बाळासाहेब वडितके, शांताराम चिंधे, बापूसाहेब तुपे,का.पोलिस पाटील चंद्रकांत ओहोळ, सोपान जाटे, विधी सेवा समितीचे संदिप शेरमाळे, शहाजी वडितके, अजित देठे, कैलास ऐनोर,डाॅ.सुनिल चिंधे, मनोहर चिंधे, संजय कुदनर, सुधाकर पिलगर, विधी सेवा समितीचे करंदिकर साहेब, ग्रामसेवक राजू ओहोळ, बाळासाहेब भोसले, राहूल चिंधे आदी उपस्थित होते.
आभार सिध्देश्वर देवस्थानचे अध्यक्ष सुनिल शिंदे यांनी मांडले.
******************************************************
******************************************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******
******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******
- बातम्या व जाहिरातीसाठी
************-संपर्क-*************
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********** मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********** मो. 9273729867
*******************************************************
*******************************************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा