शीतलटाईम्स । वर्ल्ड पार्लमेंट मेंबरशीप रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू - डॉ. दत्ता विघावे. शीतलटाईम्स । श्रीरामपूर प्रतिनिधी

  


    शीतल टाईम्स । श्रीरामपूर प्रतिनिधी


वर्ल्ड पार्लमेंट मेंबरशीप रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू  - डॉ. दत्ता विघावे.

      

 शीतलटाईम्स । श्रीरामपूर प्रतिनिधी            

                 वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन (डब्ल्यूसीपीए) अर्थात जागतीक संविधान व संसद संघाची सदस्य नोंदणी चालू झाली असल्याची माहिती संस्थेच्या महाराष्ट्र (श्रीरामपूर) चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे यांनी दिली आहे. यासाठी पात्र असलेल्या व्यक्तींनी संपर्क करावे असे आवाहन डॉ. विघावे यांनी केले आहे.

                समाजातील कला, क्रिडा, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक, पत्रकारीता, वैज्ञानिक, वैद्यकीय, अभियांत्रिकी, रक्षा, सुरक्षा, गायन, वादन व इतर सर्व क्षेत्रात राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उल्लेखनीय कार्य करणारे स्त्री, पुरुष यासाठी आवेदन करू शकतात.

                 गुणवत्ता व पात्रता असून देशाच्या संसदेवर निवड होऊ न शकणाऱ्या गुणवान व्यक्तींना जागतिक संसदेवर आपला ठसा उमटविण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे. वर्ल्ड पार्लमेंटच्या माध्यमातून आपण आपले कलागुण व उकल न झालेले प्रश्न जागतिक व्यासपिठावर मांडू शकता.

                 सुमारे दोनशे देशात कार्यरत असलेली वर्ल्ड पार्लमेंट जागतिक स्तरावर सामाजिक, पर्यावरण व कायदे विषयक कार्य करत असून संयुक्त राष्ट्रसंघाशी समतुल्य असे हिचे स्वरूप असून मुख्यालय अमेरिकास्थित कोलोरॅडो येथे असून अमेरिकेचे प्रा.डॉ.ग्लेन टि मार्टीन हे विद्यमान अध्यक्ष आहेत.

                 १) संवाद, २)अहिंसा, ३) मानवाधिकार, ४) लोकशाही व कायदा, ५) करूणा व दयाळूपणा, ६) विविधतेत एकता, ७) न्यायव्यवस्था भक्कम बनविणे, ८) स्थिरता / स्थैर्य, ९) जागतिक शिक्षण, १०) पृथ्वी घटना. या दहा सूत्री तत्व प्रणालीवर वर्ल्ड पार्लमेंट कार्य करते.

                 तरी वर्ल्ड पार्लमेंट मेंबर बनण्याची इच्छा असणाऱ्यांनी आपला बायोडाटा, पासपोर्ट फोटो  wcpa@gmail.com या इमेल आयडीवर पाठवावी व ९० ९६ ३७ २० ८२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन डॉ. दत्ता विघावे यांनी केले आहे.


******************************************************
******************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

 - बातम्या व जाहिरातीसाठी

 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

*******************************************************
*******************************************************




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव