शीतलटाईम्स - उमंग फाउंडेशनच्या वतीने पिंपरी घुमटला महात्मा गांधीजी यांची जयंती स्वच्छता अभियानाने साजरी कुटुंबाच्या निरोगी आरोग्यासाठी सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची -डॉ. संतोष गिर्‍हे शीतलटाईम्स । अहमदनगर (प्रतिनिधी)

     

  • नगर तालुक्यातील पिंपरी घुमट येथे नेहरू युवा केंद्र जय असोसिएशन संलग्न उमंग फाउंडेशन च्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या  जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना सरपंच रंभाजी सुळ ग्रामसेविका अर्चना सागर अडसुरे उमंग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर संतोष गिऱ्हे,  अंगणवाडी सेविका सुनिता जाधव, मदतनीस जया विटनोर, मुख्याध्यापक आदिनाथ सातपुते, कॉमन फाऊंडेशनचे सचिव वैशाली कुलकर्णी, अशोक शिंदे, संगीता धीवर, संगीता गायकवाड, काळू गायकवाड, राजू शिंदे आदी.

शीतल टाईम्स । अहमदनगर प्रतिनिधी

  

 

उमंग फाउंडेशनच्या वतीने पिंपरी घुमटला महात्मा गांधीजी यांची जयंती स्वच्छता अभियानाने साजरी


कुटुंबाच्या निरोगी आरोग्यासाठी सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची -डॉ. संतोष गिर्‍हे


शीतलटाईम्स । अहमदनगर (प्रतिनिधी) 


नगर तालुक्यातील पिंपरी घुमट येथे नेहरू युवा केंद्र, जय असोसिएशन संलग्न उमंग फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची जयंती स्वच्छता अभियानाने साजरी करण्यात आली. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत हा उपक्रम घेण्यात आला. तसेच यावेळी मतदार जागृती करण्यात आली.  

प्रारंभी पिंपरी घुमट ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच रभाजी सूळ, ग्रामसेविका अर्चना सागर अडसूरे, उमंग फॉउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संतोष गिर्‍हे, अंगणवाडी सेविका सुनीता जाधव, मदतनिस जया विटनोर, मुख्याध्यापक आदिनाथ सातपुते, उमंग फाउंडेशनचे सचिव वैशाली कुलकर्णी, अशोक शिंदे, संगीता धिवर, संगीता गायकवाड, काळू गायकवाड, राजू शिंदे आदी उपस्थित होते.

डॉ. संतोष गिर्‍हे म्हणाले की, सार्वजनिक स्वच्छता न पाळल्याने समाजामध्ये रोगराई पसरत आहे. कोरोनाच्या संकटानंतर स्वच्छतेला महत्त्व प्राप्त झाले असून, कुटुंबाच्या निरोगी आरोग्यासाठी सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची आहे. तर शंभर टक्के मतदान न झाल्याने देशाची प्रगल्भ लोकशाही धोक्यात येत आहे. यासाठी सर्वांनी मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे त्यांनी आवाहन केले. सरपंच रभाजी सूळ यांनी उमंग फाउंडेशनच्या वतीने घेण्यात येत असलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. या कार्यक्रमास जय असोसिएशनचे अ‍ॅड. महेश शिंदे व ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. भानुदास होले यांचे मार्गदर्शन लाभले.

 

  • नगर तालुक्यातील पिंपरी घुमट येथे नेहरू युवा केंद्र जय असोसिएशन संलग्न उमंग फाउंडेशन च्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या  जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून स्वच्छता अभियान प्रारंभ करण्यात आले यावेळी उपस्थित सरपंच रंभाजी सुळ, ग्रामसेविका अर्चना सागर अडसुरे, उमंग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर संतोष गिरहे अंगणवाडी सेविका सुनिता जाधव, मदतनीस जया विटनोर, मुख्याध्यापक आदिनाथ सातपुते कॉमन फाऊंडेशनचे सचिव वैशाली कुलकर्णी, अशोक शिंदे, संगीता धीवर, संगीता गायकवाड, काळू गायकवाड, राजू शिंदे आदी.



******************************************************
******************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

नियमित वाचा - बातम्या व जाहिरातीसाठी
 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

******************************************************
******************************************************




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव