शीतलटाईम्स - " उद्यापासून रस्ता दुरुस्तीचे काम सुरु" सार्वजनिक बांधकाम विभागाचे लेखी आश्वासन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखालील लोकसेव विकास आघाडीचे आंदोलन मागे

   


" उद्यापासून रस्ता दुरुस्तीचे काम सुरु"

सार्वजनिक बांधकाम विभागाचे लेखी आश्वासन 

माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखालील लोकसेव विकास आघाडीचे आंदोलन मागे

शीतल टाईम्स । श्रीरामपूर प्रतिनिधी

श्रीरामपूर - श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील दुरावस्था झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती तसेच मंजूर असलेल्या खडीकरण व डांबरीकरणाची कामे  मंगळवार (ता.१९) पासून सुरु करण्याची जबाबदारी आपण घेत असल्याचे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी जाहीर केल्यानंतर तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी नितीन गुजरे व जि.प.बांधकाम विभागाचे उपअभियंता बी.एस. भालेराव यांच्या लेखी आश्वासनानंतर याप्रश्नी लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे नेतृत्त्वाखाली रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले



श्रीरामपूर तालुक्यातील रस्त्यांची दैना झाली असून जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे अपघाताची शक्यता वाढली असून प्रवासी नागरीकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे सदर रस्त्यांच्या कामाची दुरुस्ती तसेच मंजूर असलेली कामे विनाविलंब सुरु करावी या मागणीसाठी लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने माजी आमदार मुरकुटे यांचे नेतृत्वाखाली अशोकनगर फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ, युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे, ज्येष्ठ नेते आण्णासाहेब चौधरी, अंबादास आदिक, माजी नगरसेविका सौ.मंजुश्री मुरकुटे, माजी सभापती प्रा.सौ.सुनिता गायकवाड, अशोक’ चे चेअरमन भाऊसाहेब कहांडळ, व्हा.चेअरमन पोपटराव जाधव, माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके, सोपानराव राऊत, काशिनाथ गोराणे, दिगंबर शिंदे, अशोक बँकेचे व्हा.चेअरमन अ‍ॅड्.सुभाष चौधरी, बाबासाहेब काळे, नाना पाटील, प्रतापराव राजेभोसले आदी उपस्थित होते.


यावेळी बोलतांना श्री.मुरकुटे म्हणाले की, आपण आमदार असतांना रस्त्यांचे वरचेवर डागडूजी, दुरुस्ती तसेच देखभाल करण्यात येत होती. त्याचप्रमाणे रस्त्यांची कामेही दर्जेदार व टिकाऊ स्वरुपाची होतील याकडे कटाक्षाने लक्ष दिले जायचे. आता मात्र रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहने चालविणे जिकरीचे बनले आहे. आता पाऊस उघडला असल्याने सदर रस्त्यांची कामे सुरु करण्यास कोणतीही अडचण नाही. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी कोणत्याही सबबी न सांगता विनाविलंब कामे सुरु करावित. यावर सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांनी श्री.मुरकुटे यांनी मागणी केल्यानुसार रस्त्यांची कामे उद्या (मंगळवार ता.१९) तात्काळ सुरु केली जातील, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर सदरचे अधिकार्‍यांच्या आश्वासनानुसार रस्त्यांची कामे सुरु करणेबाबतची जबाबदारी आपण घेत असल्याचे तहसीलदर पाटील यांनी जाहीर केले. 


सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या लेखी आश्वासनानुसार श्रीरामपूर ते नेवासा रस्ता, श्रीरामपूर ते बाभळेश्वर रस्ता, श्रीरामपूर ते बेलापूर रस्ता व श्रीरामपूर-उंदिरगाव ते नाऊर रस्ता या रस्त्यांचे रुंदीकरण, खडीकरण व डांबरीकरण तसेच अशोकनगर फाटा ते कारेगाव रस्ता (दुरुस्ती, खडीकरण व डांबरीकरण), अशोकनगर-मातापूर ते मालुंजा रस्ता (खडीकरण व डांबरीकरण), कारेगाव-भेर्डापूर ते पाथरे रस्ता (खडीकरण व डांबरीकरण), कारेगाव हद्दीतील जगताप वस्ती रस्ता (मोरी, भराव, खडीकरण व डांबरीकरण), अशोकनगर ते कारेगाव रस्ता (खडीकरण व डांबरीकरण), निमगावखैरी ते नाऊर रस्ता (खडीकरण व डांबरीकरण) आदी कामे सुरु करण्यात येणार आहेत. सदरचे कामे करण्याचे लेखी आश्वासन प्राप्त झाल्याने रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात येत असल्याचे माजी आमदार मुरकुटे यांनी जाहीर केले.

******************************************************
******************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

 - बातम्या व जाहिरातीसाठी

 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

******************************************************
******************************************************

आंदोलनानंतर अग्रवाल मंगल कार्यालय येथे कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी श्री.मुरकुटे यांनी बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित केले. यादरम्यान तहसीलदार प्रशांत पाटील हे बैठकस्थानी आले. माजी आमदार मुरकुटे व त्यांच्या सहकार्‍यांनी अत्यंत शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन केल्याबद्दल त्यांनी धन्यवाद दिले. तसेच सदरची कामे सुरु करुन पुढील पाठपुरावा करण्याची जबाबदारी आपण घेत असल्याचे जाहीर केले. याप्रसंगी भाऊसाहेब उंडे, आदिनाथ झुराळे, दत्तात्रय नाईक, दिगंबर तुवर, अभिषेक खंडागळे, निरज मुरकुटे, बाळासाहेब दांगट, गणेश भाकरे, राम पटारे, चंद्रभान पवार, अ‍ॅड्.डी.आर.पटारे, रामदास पटारे, भगत राऊत, अनिल जोशी, अमोल पटारे, बाबजी ढोकचौळे, बाळासाहेब शिंदे, कल्याण लकडे, बाबासाहेब आदिक, पांडूरंग शिंदे, मच्छिंद्र भोसले, आबासाहेब गवारे, रामभाऊ कसार, महेश पटारे, भाऊसाहेब दोंड, आशिष दोंड, युनूस पठाण, प्रमोद करंडे, मिराबाई पारधे, दत्तात्रय हळनोर, सखाराम पारखे, जगन्नाथ बिडगर, शिवाजी गायकवाड, दशरथ पिसे, शनेश्वर पवार, अरुण हळनोर, पोपट कांबळे, शिवाजी मुठे, सुभाष मुठे, विश्वास क्षीरसागर, अशोक कारखान्याचे संचालक मंडळाचे सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच लोकसेवा विकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक संजय सानप व त्यांच्या सहकार्‍यांनी चोख पोलीस बंदोबस्त राखला. 

 



 





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव