शीतलटाईम्स - खाद्यतेलाचे भाव होणार कमी ! केंद्र सरकारचा निर्णय ! शीतल टाईम्स । मुंबई वृत्तसेवा

   

खाद्यतेलाचे भाव होणार कमी ! केंद्र सरकारचा निर्णय ! 

 शीतल टाईम्स । वृत्तसेवा मुंबई



खाद्यतेलाचे भाव होणार कमी ! केंद्र सरकारचा निर्णय ! 


 शीतल टाईम्स । वृत्तसेवा मुंबई


गेल्या अनेक दिवसांपासून भरमसाठ वाढलेले खाद्यतेलाचे दर कमी होत आहेत. ऐन सनासुदीत या निर्णायाचा फायदा सर्वसामान्य जनतेला सणासुदीत होणार आहे.



एकीकडे भाज्यांसह सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढत असताना ऐन सणासुदीच्या काळातच खाद्यतेलाचे भाव कमी होत असल्याने सामान्य जनतेला दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे यंदाची दिवाळीची आर्थिक ओढाताण काही प्रमाणात कमी होणार आहे. खाद्यतेलावरील आयातशुल्क हे कमी करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिलेले आहेत.


केंद्र सरकारकडून खाद्यतेल आणि तेलबियांवरील आयातशुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला होता. यातच आता कच्च्या तेलावरील सीमाशुल्कही रद्द करण्यात आला आहे. याचाच अर्थ असा की, सरकारने पामतेल आणि सनफ्लावॅर तेल यावरील कृषी उपकर आणि कस्टम ड्युटी कमी केली आहे. त्यामुळे दरात घसरण होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खाद्यतेलावरील दर नियंत्रणात ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पध्दतीने प्रयत्न केले जात होते. वेळप्रसंगी व्यापारी आणि शेतकरी संघटनांकडून या निर्णयाला विरोधही करण्यात आला होता. मात्र, आता आयातशुल्क कमी करण्याचे निर्देशच राज्य सरकार यांना देण्यात आल्याने किमान सणामध्ये तरी दर कमी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


आयातशुल्क कमी करण्यासंदर्भात एक कालावधी ठरवण्यात आलेला आहे. सरकारने 31 मार्च 2022 पर्यंत पाम, सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या तेलाच्या कच्च्या जातींवरील कृषी उपकर कमी केले आहे. याचा फायदा असा होणार आहे की, खाद्य तेलाच्या किंमती तर कमी होतीलच पण सणासुदीच्या काळात देशांतर्गत खाद्यतेलाचा तुटवडा भासणार नाही. कच्च्या पाम तेल, कच्च्या सोयाबीन तेल आणि कच्च्या सूर्यफुलाच्या तेलावरील शुल्क हे 2.5 टक्क्यांवरून शून्य करण्यात आले आहे. कच्च्या पामतेलाचे कृषी उपकर 20 टक्क्यांवरून 7.5 टक्क्यांपर्यंत आणि कच्च्या सोयाबीन तेल आणि कच्च्या सूर्यफुलाच्या तेलासाठी 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहेत.




सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार खाद्यतेलावरील जकात कमी करण्यात आली आहे. तसेच कृषी उपकरही कमी केला जातो.सरकारने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, कच्च्या पाम तेलावरील शुल्क 8.25% केला आहे जो आगोदर 24.75%, आरबीडी पामोलिन 19.25 तर आगोदर 35.75, आरबीडी पाम तेल 19.25 केला आहे आगोदर 35.75, कच्चे सोया तेल 5.5 सध्या केला आहे तर पूर्वी २४.७५, रिफाइंड सोया तेल 19.5 सध्या तर आगोदर 35.75, कच्चे सूर्यफुलाचे तेल 5.5 तर पूर्वी 24.75 आणि सूर्यफुलाचे तेल 19.25 आगोदर 35.75 होते. शुल्ककमी केल्यामुळे तेलाच्या दरात घट झाली आहे. ही शुल्क कपात 14 ऑक्टोबरपासून लागू झाली असून 31 मार्च 2022 पर्यंत लागू राहील राहणार असल्याचे टीव्ही 9 च्या वृत्तात म्हटले आहे.


******************************************************

******************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

 - बातम्या व जाहिरातीसाठी

 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

*******************************************************
*******************************************************




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव