शीतलटाईम्स - विवाहित महिलेला लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार ; गुन्हा दाखल शीतलटाईम्स । अहमदनगर (प्रतिनिधी)

  

विवाहित महिलेला लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार ; गुन्हा दाखल


    शीतल टाईम्स । अहमदनगर प्रतिनिधी


विवाहित महिलेला लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार ; गुन्हा दाखल


   शीतल टाईम्स । अहमदनगर प्रतिनिधी


विवाहित महिलेला लग्नाचे अमिष दाखवून वेळोवेळी महिलेच्या इच्छेविरुध्द शारिरीक संबंध प्रस्थापित करुन अत्याचार केल्याप्रकरणी कोतवाली पोलिस स्टेशनला केडगाव येथील खुशाल ठारुमल ठक्कर या व्यक्तीविरोधात बलात्कार, फसवणुक व जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

जळगाव येथील विवाहित महिलेशी आरोपीचे नात्याचे संबंध होते. मात्र पिडीत महिलेचा नवरा व्यसनाधीन असल्याचा फायदा घेऊन आरोपीने फिर्यादी महिलेस लग्नाचे अमिष दाखवून तिला शहरातील अरणगाव रोडला राहण्यासाठी आनले. 22 एप्रिल 2019 ते 4 ऑक्टोबर 2021 पर्यंत अरणगाव येथील महिलेला तिच्या राहत्या घरी तिच्या इच्छेविरुध्द आरोपीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. महिलेने आरोपीस लग्नाची विचारणा केली असता, त्याने धमकावण्यास सुरुवात केली व जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी खुशाल ठारुमल ठक्कर याने पिडीत महिलेला वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर इच्छेविरुध्द संभोग केला व लग्नाबद्दल विचारणा केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पिडीत महिलेने फिर्यादीत म्हंटले आहे. यावरुन सोमवार दि. 11 ऑक्टोबर रोजी खुशाल ठारुमल ठक्कर यांच्या विरोधात कोतवाली पोलीस स्टेशनला कलम 376, 420, 506 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.




******************************************************
******************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

 - बातम्या व जाहिरातीसाठी

 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

*******************************************************
*******************************************************




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव