शीतलटाईम्स - माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली उद्या रास्ता रोको
शीतल टाईम्स । प्रतिनिधी श्रीरामपूर
माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली उद्या रास्ता रोको
शीतल टाईम्स । प्रतिनिधी श्रीरामपूर
माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली उद्या रास्ता रोको
| प्रतिकात्मक चित्र |
शीतल टाईम्स । प्रतिनिधी श्रीरामपूर
श्रीरामपूर ते नेवासा तसेच अशोकनगर फाटा ते कारेगाव या रस्त्यांची आठ दिवसांत दुरुस्ती करावी याबाबतचे निवेदन देवूनही कोणतीच कार्यवाही न झाल्याने सदर रस्त्यांच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली सोमवार (ता.१८) रोजी दुपारी २ वाजता अशोकनगर फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती लोकसेवा आघाडीचे अध्यक्ष हिंमतराव धुमाळ यांनी दिली आहे.
यासंंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात धुमाळ यांनी सांगीतले की, श्रीरामपूर ते नेवासा तसेच अशोकनगर फाटा ते कारेगाव या दोन्ही रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या दोन्ही रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित दुरुस्ती करावी अशी लेखी मागणी प्रांताधिकारी, तहसिलदार तसेच सार्वजनिक विभागाकडे निवेदनाव्दारे सदर रस्त्याच्या लाभधारक ग्रामस्थांनी केली होती. तसेच सदर मागणीची दखल घेवून कार्यवाही न झाल्यास माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे नेतृत्वाखाली रास्तारोको करण्याचा इशारा देण्यात आला होता.
सदर निवेदनाची व मागणीची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे येत्या सोमवार रोजी दुपारी २ वाजता माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली संबंधित रस्त्याचे लाभधारक अशोकनगर फाटा येथे रास्तारोको आंदोलन करणार असून याप्रसंगी नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन लोकसेवा आघाडीचे अध्यक्ष हिंमतराव धुमाळ यांचेसह अशोक कारखान्याचे चेअरमन भाऊसाहेब कहांडळ, माजी चेअरमन कोंडीराम उंडे, सोपानराव राऊत, ज्ञानदेव साळुंके, दिगंबर शिंदे, भाऊसाहेब उंडे, दत्तात्रय नाईक, बाबासाहेब काळे, पुंजाहरी शिंदे, दिगंबर तुवर, काशिनाथ गोराणे, मंजाबापू थोरात, अॅड्.डी.आर.पटारे, माणिकराव पवार, नितीन दांगट, दशरथ पिसे, बाळासाहेब दांगट, उद्धव आहेर, माजी सरपंच आशिष दोंड, चंद्रभान पवार, बाळासाहेब उंडे, डॉ.संतोष जाधव, राधुजी उंडे, शिवाजी टेकाळे, कल्याण लकडे, अल्ताफ खान पठाण, सोमनाथ पारखे, शनैश्वर पवार, शिवाजी गायकवाड, भगत राऊत, बजरंग दरंदले, साहेबराव हळनोर, सखाराम पारखे, जालिंदर उंडे, सुनिल पटारे, दत्तात्रय नागुडे आदिंनी केले आहे.
******************************************************
******************************************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******
******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******
- बातम्या व जाहिरातीसाठी
************-संपर्क-*************
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********** मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********** मो. 9273729867
*******************************************************
*******************************************************


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा