शीतलटाईम्स - अशोक कारखान्यास २८ कोटींचा संचित तोटा ! ; शेतकरी संघटनेचे अनिल औताडे यांचा आरोप शीतल टाईम्स । श्रीरामपूर प्रतिनिधी
अशोक कारखान्यास २८ कोटींचा संचित तोटा ! ; शेतकरी संघटनेचे अनिल औताडे यांचा आरोप
शीतल टाईम्स । श्रीरामपूर प्रतिनिधी
अशोक कारखान्यास २८ कोटींचा संचित तोटा ! ; शेतकरी संघटनेचे अनिल औताडे यांचा आरोप
शीतल टाईम्स । श्रीरामपूर प्रतिनिधी
अशोक सहकारी साखर कारखान्याचे सुत्रधार माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यावर ऊस उत्पादक सभासद व कामगारांनी मागील गेल्या तीस वर्षापासून विश्वास टाकला. परंतु त्यांच्याकडून मागील दहा वर्षापासून वेळेत ऊस उत्पादकांना व कामगारांना घामाचे दाम दिले गेले नाही. एफ आर पी व्यतिरिक्त पेमेंट मिळालेले नसल्याने आजपर्यंत महसुली उत्पन्नात तूट आलेली आहे. आजही कारखान्याचा संचित तोटा २८ कोटी रुपये असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल औताडे यांनी केला आहे.
अशोक सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गाळप हंगाम २००९ ते १० मध्ये एफ. आर. पी १२५० असताना ७५० रुपये एफ.आर.पी पेक्षा ज्यादा दिले. अंतीम दर २००० रुपये मिळाला. त्या वेळी साखर २२०० रु प्रतिक्विंटल विकली गेली. गाळप हंगाम २०२०-२१ रु चा एफ.आर.पी २२०० असून साखरेचे दर ३५०० रु आहेत. गत गाळप हंगाम २००९-१० च्या तुलनेत गाळप हंगाम २०२०-२१ साठी एफ.आर.पी व्यतिरिक्त ८०० ते १००० हजार रुपये अंतिम पेमेंट दिपावली पूर्वी देणे शक्य आहे. तसेच कामगारांचे ऊस उत्पादकांप्रमाणे सर्व थकीत पगार दीपावली पूर्वी करावे.
गाळप हंगाम २०२०-२१ ची सरासरी रिकव्हरी साखर, मळी व इथेनॉल अशी सर्व मार्गांनी मिळून १२.२७ टक्के मिळाली आहे. त्याप्रमाणे १० टक्के रिकव्हरी ला २९५० रु आधिक २.२७ टक्क्यांचे चे ७०० रूपये असे एकूण ३६०० रूपये तोडवाहतूक ६४० रु म्हणजे ३०५० रु एफ.आर.पी निघत असून त्याप्रमाणे पहिले पेमेंट देण्याची घोषणा करून सभासदांच्या कामगारांच्या हित रक्षणासाठी अशोकच्या संचालक मंडळाने धाडस दाखवावे असे आवाहन औताडे यांनी या निवेदनात केले आहे. निवेदनावर अनिल औताडे, युवराज जगताप, हरिभाऊ तुवर, शरद पवार, बबनराव उगडे, दिलीप औताडे, रावसाहेब गलांडे, संजय नाईक व अल्लाऊद्दीन इनामदार आदींच्या सह्या आहेत.
******************************************************
******************************************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******
******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******
- बातम्या व जाहिरातीसाठी
************-संपर्क-*************
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********** मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********** मो. 9273729867
*******************************************************
*******************************************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा