शीतलटाईम्स - 'श्रीरामपूर भूषण पुरस्कार' हा डॉ. बाबुराव उपाध्ये यांना मिळालेला सन्मान प्रेरणादायी - प्राचार्या डॉ. गुंफा कोकाटे शीतलटाईम्स बेलापूर (प्रतिनिधी)
डॉक्टर बाबुराव उपाध्ये यांना मिळालेला 'श्रीरामपूर भूषण पुरस्कार' हा प्रेरणादायी - प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे
डॉक्टर बाबुराव उपाध्ये यांना मिळालेला 'श्रीरामपूर भूषण पुरस्कार' हा प्रेरणादायी - प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे
शीतल टाईम्स बेलापूर प्रतिनिधी
श्रीरामपूर नगरपरिषदेतर्फे साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांना 'श्रीरामपूर भूषण पुरस्कार 'देण्यात आला हा आम्हा सर्व साहित्यिकांना प्रेरणादायी असल्याचे मत बेलापूर येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. गुंफाताई कोकाटे यांनी व्यक्त केले.
बेलापूर येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात आझादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार साहित्य अकादमी मुंबई अंतर्गत 'ग्रामोलोक' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ.बाबुराव उपाध्ये यांचा महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी प्राचार्या डॉ. गुंफा कोकाटे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेलापूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री.गणपतलाल मुथ्था हे होते.
या प्रसंगी संस्थेचे सचिव अॅड.शरद सोमाणी, संचालक बापूसाहेब पुजारी, उदघाटक साहित्य अकादमी सदस्या कवयित्री सुमतीताई लांडे, कविसंमेलनाचे प्रमुख पाहुणे सांगलीचे उपजिल्हाधिकारी गणेश मरकड, सौ.माधुरी मरकड, यशवंत पुलाटे, संगीता फासाटे हे उपस्थित होते. या निमंत्रित कवींबरोबरच प्राचार्या डॉ.गुंफा कोकाटे, डॉ.बाबुराव उपाध्ये, सूत्रसंचालक डॉ. अशोक माने यांनीही कविता सादर केल्या. प्राचार्या डॉ.गुंफा कोकाटे यांनी आपल्या स्वागत, परिचयातून डॉ.बाबुराव उपाध्ये यांच्या साहित्यसेवेचा विस्तृत परिचय देऊन श्रीरामपूर नगरपरिषदेने डॉ.उपाध्ये यांना दिलेल्या पुरस्काराबद्दल कौतुक केले. साहित्यिकांनी साहित्यिकांची दखल घेतली पाहिजे, डॉ. उपाध्ये यांचे नगर जिल्ह्याच्या साहित्यसेवेत मोठे योगदान आहे, म्हणून आम्हाला त्यांचा सन्मान सर्वांच्या उपस्थितीत करताना आनंद वाटतो अशा भावना व्यक्त केल्या.
उपस्थित मान्यवरांनी डॉ. उपाध्ये यांचे अभिनंदन व कौतुक केले. मान्यवरांची भाषणे झाली. सत्काराला उत्तर देताना डॉ.उपाध्ये म्हणाले की, महाविद्यालयाने केलेला हा सन्मान माझ्या साहित्यवाटेवर नेहमी प्रेरक ठरणारा आहे. प्राचार्या डॉ.गुंफाताई कोकाटे यांची गुणग्राहकता आणि साहित्यजिव्हाळा सदैव स्फुर्तीप्रद असल्याचा आनंद व्यक्त केला. डॉ.उपाध्ये यांना ग्रंथालयास पुस्तके भेट दिली. अॅड.शरद सोमाणी यांनी मनोगत व्यक्त करून डॉ.उपाध्ये यांचे कौतुक केले. प्रा.डॉ.अशोक माने यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.निजाम शेख यांनी समीक्षात्मक आभार मानले.
जेष्ठ साहित्यिक डॉ.बाबुराव उपाध्ये यांना 'श्रीरामपूर भूषण पुरस्कार' मिळाल्याबद्दल बेलापूर येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्या डॉ.गुंफा कोकाटे यांच्या संयोजनाखाली सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी साहित्य अकादमी सदस्या कवयित्री सुमतीताई लांडे, ॲड.शरद सोमाणी, उपजिल्हाधिकारी कविवर्य गणेश मरकड, कवयित्री सौ.माधुरी मरकड, कविवर्य यशवंत पुलाटे, प्रा.डॉ.विलास गायकवाड आदी.
******************************************************
******************************************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******
******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******
- बातम्या व जाहिरातीसाठी
************-संपर्क-*************
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********** मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********** मो. 9273729867
*******************************************************
*******************************************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा