शीतलटाईम्स । रक्तदान देवदूतांचा श्रीरामपुरात सन्मान शीतलटाईम्स । श्रीरामपूर प्रतिनिधी

  


    शीतल टाईम्स । प्रतिनिधी



रक्तदान देवदूतांचा श्रीरामपुरात सन्मान 

 

शीतलटाईम्स । श्रीरामपूर प्रतिनिधी 


दहा वर्षापासून रुग्णसेवेसाठी समर्पित वृत्तीने तन मन धनाने जिल्ह्यात कोठेही रुग्ण वाचविण्यासाठी धडपड करत रक्तदान करण्यासाठी चोवीस तास तयार असलेले श्रीरामपूर रक्तदान ग्रुपचे सर्व सदस्यांचा इंडियन रेड क्रॉस सोसायटीने आमदार लहुजी कानडे यांचे शुभहस्ते प्रशस्तीपत्रक व आरोग्य किट देऊन गौरव करण्यात आला.


               प्रमुख अतिथी म्हणून आमदार लहुजी कानडे,माजी आमदार भानुदास मुरकुटे साई संस्थान विश्वस्त सचिन गुजर, नगराध्यक्षा अनुराधा ताई आदिक, गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, सचिव सुनील साळवे,के के आव्हाड, अविनाश आपटे भरत कुंकलोळ सतीश कुंकुलोळ, प्रमोद पत्की, बाळासाहेब सोनटक्के, प्रवीण साळवे, पोपटराव शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.

                 प्रास्तविक मध्ये रक्तदान ग्रुपचे कौतुक करताना सुनील साळवे म्हणाले हे सर्व दाते रक्त देण्यासाठी स्वतःचा वेळ, व खर्च करून दवाखान्यात जातात आज या गृपमुळे हजारो रुग्णांचे प्राण वाचून त्यांना नवजीवन मिळाले त्यांच्या त्यागाला तोड नाही समाजात हेच खरे देवदूत आहेत यांचा सन्मान होणे म्हणजे त्यांना प्रेरणा देणे होय त्यासाठीच रेड क्रॉस ने हा सत्कार्याचा सत्कार आयोजित केलेला आहे.


                 ग्रुपचे प्रमुख फिरोज भाई पिंजारी यांच्या कार्याचा गौरव करून फिरोज व त्यांचे सर्व सदस्य महाराष्ट्रात रक्तदान ग्रुप चालवत असल्याने श्रीरामपूरचे नाव मोठे होत असल्याचे सुनील साळवे यांनी सांगितले. आमदार कानडे यांनीही रक्तदान ग्रुप कार्याचे स्तुती करून समर्पित कामाला धन्यवाद दिले.


               यावेळी रक्तदान ग्रुप चे सदस्य फिरोज शेख, अक्षय चौधरी, हरीश मुसमाडे, आयाज जहागीरदार, लियाकत पिंजारी, संदीप लबडे, वाल्मीक पवार, गणेश गवारे,हमीद पिंजारी, कानिफनाथ धिरडे, राहुल सोनावणे, संतोष वाघ, योगेश जोशी, ओमश्री बलदंड, किशोर सोसे, जिनेश जनवेजा आदींचा प्रमाणपत्र व आरोग्य किट देऊन सन्मान करण्यात आला.


               आभार प्रवीण साळवे यांनी तर विनीत कुंकुलोळ यांनी सूत्रसंचलन केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सुरेश वाघुले, पोपटराव शेळके, राजेंद्र केदारी, सुखदेव शेरे, उमेश अग्रवाल, सुनील शेळके सोमनाथ परदेशी, श्रावण भोसले, संजय दुशींग,नानासाहेब मुठे, कांतीलाल शिंदे, सोपान ननावरे, विश्वास भोसले, शोभा शेंडगे, पुष्पा शिंदे, सविता साळुंके, सागर गिरनारे , राजेंद्र कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले.


******************************************************
******************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

 - बातम्या व जाहिरातीसाठी

 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

*******************************************************
*******************************************************




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव