शीतलटाईम्स - शेत जमीन व्यवहार फसवणुकप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल शेत जमीनीसाठी बनावट साठेखत व तोतया इसम उभा करुन स्टॅम्प ड्युटी भरल्याची शेतकर्याची फिर्याद शीतलटाईम्स । अहमदनगर (प्रतिनिधी)
शेत जमीन व्यवहार फसवणुकप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
शीतल टाईम्स । अहमदनगर प्रतिनिधी
शेत जमीन व्यवहार फसवणुकप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
शेत जमीनीसाठी बनावट साठेखत व तोतया इसम उभा करुन स्टॅम्प ड्युटी भरल्याची शेतकर्याची फिर्याद
शीतलटाईम्स । अहमदनगर (प्रतिनिधी)
वाळूंज येथील शेत जमीनीसाठी बनावट खोटे साठेखत व तोतया इसम उभा करुन स्टॅम्प ड्युटी व नोंदणी शुल्क भरुन फसवणुक केल्याप्रकरणी महेश सुमतीलाल संचेती, जितेंद्र रतीलाल नहार व अशोक बाबू गायकवाड या तिघां विरोधात शेतकरी बाळू नानाजी गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशनला बुधवार दि.13 ऑक्टोबरला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश संचेती याच्यावर फसवणुकीचा आनखी एक गुन्हा दाखल झाला असून, यापूर्वी त्याच्यावर 4 ऑगस्ट 2021 रोजी तोफखाना पोलीस स्टेशनला परस्पर नोटरी व साठेखत केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.
बाळू नानाजी गायकवाड (वय 60 वर्षे) यांच्या मालकीची वाळुंज येथे (ता. नगर) गट नं. 288 क्षेत्र 1 हेक्टर 22 आर शेत जमीन आहे. डिसेंबर 2020 मध्ये शेतात काही व्यक्तींनी येऊन सदर जागेचा व्यवहार केला असून, आमचा जागेवर मालकी हक्क असल्याचे सांगितले. त्यांनी 15 मे 2017 रोजी नोटरी साठेखताचा दस्त दाखविला. त्यामध्ये फिर्यादीला त्यांच्या ओळखीचा इसम असलेला अशोक बाबू गायकवाड (रा. विळद, ता. नगर) याचा फोटो दिसला. फिर्यादीने बनावट साठेखत तयार केल्याप्रकरणी संबंधीतांना विचारणा केली असता, त्यांना जागे खाली करण्यासाठी धमकावून सदर व्यक्ती निघून गेले.
याप्रकरणी अधिक चौकशी केली असता खरेदी दस्त नोंदणी करिता महेश सुमतीलाल संचेती व जितेंद्र रतीलाल नहार यांनी अशोक बाबू गायकवाड या व्यक्तीस मुळ शेतकरी बाळू गायकवाड असल्याचे भासावून त्यांच्याशी संगनमत करुन तोतया इसम उभा करुन माझी मिळकत स्वत:च्या फायद्यासाठी खासगी नोटरीकडे 15 मे 2017 रोजी दस्त नोंदविला असल्याचे आढळले. याप्रकरणी अधिक तपास केला असता सदर मिळकत हस्तांतरण करण्यासाठी 1 लाख 58 हजार शंभर रुपयाची स्टॅम्प ड्युटी व नोंदणी शुल्क 16 मे 2017 रोजी जिल्हाधिकारी कार्यालया जवळील एका वकिलाकडे जमा केले. सदर वकिलाकडे चौकशी केल्यानंतर सदरची स्टॅम्प ड्युटी जमीनीच्या खरेदी पोटी संचेती व नहार यांनी भरल्याचे खात्रीशीर समजले. या बोगस प्रकरणामुळे आमच्या भावाभावांचे भांडणे झाले. महेश सुमतीलाल संचेती, जितेंद्र रतीलाल नहार व अशोक बाबू गायकवाड यांनी संगनमत करुन माझी मिळकत बनावट साठेखत व तोतया इसम उभा करुन स्टॅम्प ड्युटी व नोंदणी शुल्क भरुन माझी व शासनाची फसवणुक केल्याचे शेतकरी बाळू नानाजी गायकवाड यांनी म्हंटले आहे. या फिर्यादीवरुन आरोपींवर कलम 417, 419, 420, 465, 511 व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
******************************************************
******************************************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******
******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******
- बातम्या व जाहिरातीसाठी
************-संपर्क-*************
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********** मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********** मो. 9273729867
*******************************************************
*******************************************************


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा