शीतलटाईम्स - नगरच्या कलाकाराचा कलेतून संदेश... कलारंग अकॅडमी च्या विद्यार्थ्यांनी काढली वास्तववादी रांगोळी....... गडकरी साहेब, आमचे नगर खड्डेमुक्त करा...

  



  शीतल टाईम्स । अहमदनगर प्रतिनिधी 


 

नगरच्या कलाकाराचा कलेतून संदेश...


कलारंग अकॅडमी च्या विद्यार्थ्यांनी काढली वास्तववादी रांगोळी.......

गडकरी साहेब, आमचे नगर खड्डेमुक्त करा...


अहमदनगर (प्रतिंनिधी) :-   गुलमोहोर रोड वरील कमलाबाई नवले, मंगल कार्यालयात कलारंग अकॅडमीच्या , सुजाता पायमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या ७  विद्यार्थ्यांनी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची आकर्षक रांगोळी रेखाटली. नितीन गडकरी यांच्या हस्ते आज नगरमध्ये २५ महामार्गांच्या  प्रकल्पाचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा संपन्न झाला. 

वाहतूक आणि रस्ते मंत्री असल्याने गडकरी साहेब, आमचे नगर शहर खड्डेमुक्त करा, असा संदेश या रांगोळीतून देण्यात आला. जवळपास ७ x ९ फूट असलेली ही रांगोळी काढण्यासाठी ७  जणांना ६  तास लागले.  गडकरी साहेब नगरमध्ये येत आहेत आणि त्यांच्या पाठोपाठ नगरमधील रस्ते ही सुधारत आहेत,असा एक भाबडा संदेश या रांगोळीतून देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, असे कलारंग अकॅडमी च्या संचालिका सुजाता पायमोडे यांनी सांगितले. तसेच नवले मंगल कार्यालयात कलारंग अकॅडमी च्या वतीने अतिवास्तववादी रांगोळी कार्यशाळा आयोजित करण्यात आलीय. 


या कार्यशाळेत विविध प्रकारच्या रांगोळ्या नगरकरांना मोफत बघायला मिळणार आहेत. अकॅडमी मधील  १६ ते १७ वयोगटातील मुलांनी ह्या रांगोळ्या काढल्या आहेत. रविवारी सायंकाळपर्यंत हे प्रदर्शन नगरकरांसाठी खुले असणार आहे, अशी माहिती, पायमोडे यांनी दिली. 


  •   कलारंग अकॅडमीच्या, सुजाता पायमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या ७  विद्यार्थ्यांनी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची आकर्षक रांगोळी रेखाटली. (छाया :-  ऋषिकेश राऊत)


******************************************************
******************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

नियमित वाचा - बातम्या व जाहिरातीसाठी
 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

*******************************************************
*******************************************************




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव