शीतलटाईम्स - शिर्डी संस्थानने अद्यावत हॉस्पिटल उभारावे - आमदार कानडे नूतन विश्वस्त सत्कार सोहळा संपन्न शीतलटाईम्स । श्रीरामपूर (प्रतिनिधी)

  


    शीतल टाईम्स । श्रीरामपूर प्रतिनिधी


शिर्डी संस्थानने अद्यावत हॉस्पिटल उभारावे - आमदार कानडे


नूतन विश्वस्त सत्कार सोहळा संपन्न


शीतलटाईम्स । श्रीरामपूर (प्रतिनिधी) 


आपल्या जिल्ह्यामधे अद्यावत सर्व सोयींनी सुसज्ज हॉस्पिटल ची कमतरता आहे. गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी पुणे, मुंबई, नाशिक अशा शहरात जावे लागते. येथे उपचारासाठी येणारा खर्चही अतिशय महागडा असून तो सर्वसामान्यांना न परवडणारा आहे. त्यामुळे अनेकांना प्राणांना मुकावे लागते. कुटुंबाची वाताहत होते, बाहेर सर्वच गैरसोयीचे असते, अशा पार्श्वभूमीवर नूतन विश्वस्त मंडळांनी शिर्डीमध्ये सुसज्ज असे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधले तर गरीब व सामान्यांना वैद्यकीय उपचार घेता येतील तेव्हा जिल्ह्यातील नागरिकांच्या मागणीचा सर्व नूतन विश्र्वस्तानी योग्य निर्णय घ्यावा असे आवाहन तालुक्याचे आमदार लहुजी कानडे यांनी केले.


 इंडियन रेड क्रॉस सोसायटी, युवक बिरादरी, पोलीस मित्र संघटना, अंधश्रध्दा निर्मुलन समिती, महाराष्ट्र एन जी ओ फेडरेशन आदींच्या संयुक्त विद्यमाने श्री साईबाबा संस्थान शिर्डी नूतन विश्वस्त अनुराधा आदिक, सचिन गुजर, सुरेश वाबळे, महेंद्र शेळके, अविनाश दंडवते आदींचा सन्मानपत्र, शाल, बुके देऊन गौरव करण्यात आला आहे.


प्रमुख अतिथी म्हणून आमदार लहुजी कानडे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, अविनाश आपटे, के.के आव्हाड, शरद नवले, बाबासाहेब दिघे, गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, संजय जोशी, राजू सोनावणे, राजेश अलघ, रवी पाटील, रवींद्र गुलाटी, सिद्धार्थ मुरकुटे, लकी सेठी, अशोक थोरे, संजय छल्लारे, सोहेल शेख, दीपक चव्हाण, अनिल चोरडिया, मनोज पोरवाल, सतिश कुंकुलोळ, कल्याण कुंकुलोळ, प्रेमचंद कुंकुलोळ, सुधीर वायखिंडे आदी मान्यवर उपस्थित होते.


प्रारंभी संयोजक जिल्हा सचिव सुनील साळवे यांनी सर्व सामाजिक संस्थेची माहिती देताना 20 वर्षापासून केलेल्या कार्याची माहिती दिली. त्यानंतर मान्यवरांचा सर्व संस्थानच्या वतीने सन्मान करण्यात आला. रेड क्रॉस रक्तदान टीम चे प्रमुख फिरोज पिंजारी व सदस्य यांचा आमदार लहू कानडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. मनोगत व्यक्त करताना माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी संस्थानने धार्मिक कर्याबरोबर भाविकांसाठी सुलभ योजना राबवाव्यात, वैद्यकीय सोयी द्याव्यात, नवनवीन तंत्र ज्ञानाचा वापर करून शिर्डीची वाटचाल विकासाकडे न्यावी असे आवाहन केले.


नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी मिळालेल्या संधीच सोननं करण्यासाठी व लोकाभिमुख काम करण्यासाठी मला संधी मिळाली त्याचा उपयोग सामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी करून आपली निवड सार्थ असल्याचे दिसेल. जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष नूतन संचालक सचिन गुजर यांनी सांगितले साईबाबा संस्थांचे अध्यक्ष स्व.जयंतराव ससाणे यांचे काळात सर्व कारभार जवळून पाहिलेले आहे कारोना काळात शिर्डी हॉस्पिटल मध्ये अद्यावत सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करू. शासणाबरोबर कार्य करणाऱ्या इंडियन रेड क्रॉस या जागतिक संस्थेने आमचा सत्कार केला हे भाग्यच समजतो. पद हे काम करण्याचे माध्यम आहे. त्याचा नक्कीच सर्वांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी उपयोग करील असे सांगत मला काम करताना स्व.जयंतराव ससाणे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार लहू कानडे, स्व. गोविंदराव आदिक, माजी आमदार भानुदास मुरकुटे, आमदार सुधीर तांबे या सर्वांच्या मार्गदर्शनाचा खूप फायदा करता येणार असल्याचे सचिन गुजर यांनी सांगितले.


सुत्रसंचलन विनीत भरत कुंकुलोळ यांनी केले तर प्रितेश कुंकुलोळ यांनी आभार मानले कार्यक्रम पार पाडण्यासाठी भरत कुंकुलोळ, सुनील साळवे, प्रवीण साळवे, प्रमोद पत्की, पोपटराव शेळके, विनीत कुंकुलोळ, श्रावण भोसले, प्रेमनाथ सोनुने, नानासाहेब मुठे, शोभा शेंडगे, सविता साळुंके, पुष्पा शिंदे, हर्षल कुंकुलोळ, बाळासाहेब सोनटक्के, साहेबराव रकटे, सोपान ननावरे, सागर गिरणारे व युवा रेड क्रॉस आदींनी विशेष परिश्रम घेतले.


******************************************************
******************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

 - बातम्या व जाहिरातीसाठी

 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

*******************************************************
*******************************************************




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव