शीतलटाईम्स - जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत स्रिया मुक्ततेच्या वाटेवर- सुमती लांडे शीतलटाईम्स । बेलापूर (प्रतिनिधी)
जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत स्रिया मुक्ततेच्या वाटेवर- सुमती लांडे
शीतल टाईम्स । प्रतिनिधी बेलापूर
शीतल टाईम्स । प्रतिनिधी बेलापूर
जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतही संस्कार सांभाळून स्त्रियांना आज मुक्तता हवी आहे. बदलत्या जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर व सामाजिक वास्तवात स्त्रियांची मानसिकता कवितेतून व्यक्त होते. आधुनिकीकरण झाले असले तरी स्री अजूनही आपल्या संस्कृतीला विसरली नाही. त्यातून भारतीय स्त्रिया आपल्या रक्तातून परंपरा जपून संस्कारांना न सोडता त्या मुक्तते कडे आज वाटचाल करीत आहे असे विचार साहित्य अकादमी मुंबईच्या सदस्या कवयित्री सुमती लांडे यांनी व्यक्त केले.
येथिल बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार साहित्य अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रामालोक कार्यक्रमात उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गणपतलाल मुथा हे होते. यावेळी विचारपीठावर कार्यक्रमाचे उद्घाटक सुमती लांडे, ग्रामीण कवी यशवंत पुलाटे उपजिल्हाधिकारी गणेश मरकड, रिंगणकार कवयित्री माधुरी मरकड, कवयित्री संगीता फासाटे, साहित्यिक प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये, संस्थेचे सचिव अॅड. शरद सोमाणी, संचालक बापूसाहेब पुजारी, प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुमती लांडे पुढे म्हणाल्या की, खेड्यापाड्यातील व्यथा-वेदना, संस्कृती यातून ग्रामीण साहित्य खऱ्या अर्थाने जन्माला येते. ग्रामीण स्त्रियांनाही हळूहळू जोखडामधूनही मुक्तता हवी आहे मात्र आज स्त्रियांवर होणारे अन्याय, अत्याचार त्यांच्यावर असणाऱ्या अदृश्य बंधनाविषयी समाजात अजूनही जागृती निर्माण होऊ शकत नाही अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी यशवंत पुलाटे यांनी ग्रामीण जीवन, पाटीलकी कृषी, शेतकरी, आणि त्यांचे कष्टप्रद जीवनाचे वास्तव चित्रण कवितेच्या माध्यमातून व्यक्त केले. उपजिल्हाधिकारी गणेश मरकड यांनी नागरी जीवन आणि ग्रामीण जीवनामधील दरी, श्रीमंत व गरीब या मधील ज्वलंत चित्रणाचे वास्तव व्यक्त केले. तर रिंगणकार कवित्री माधुरी मरकड यांनी स्री जीवनाच्या वेगवेगळ्या व्यथा, त्यांच्या भावभावना राजकीयता याबाबत नव्या बाबी प्रतिबिंबित केल्या.
कवयित्री संगीता फासाटे यांनी उपेक्षित समाजाच्या समस्या कन्या भ्रूणहत्या आणि मजुरांची शोषण नीती यावर प्रकाश टाकला. साहित्यिक प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी वैयक्तिक जाणिवांचे सामाजिकीकरण आपल्या कवितांमधून उत्तम प्रकारे व्यक्त केले. यावेळी प्राचार्य डॉ गुंफा कोकाटे, प्रा. डॉ .अशोक माने यांनीही कविता सादर केल्या. सुमती लांडे यांनी आजी, बंद असतात दारे, अनोळखी, लहरते उजेड या कविता सादर केल्या. सदर प्रसंगी महाविद्यालयाच्या ग्रंथालयास प्राचार्य मंगल पाटील, डॉ.बाबुराव उपाध्ये व डॉ.दादासाहेब गलांडे या साहित्यिकांनी दहा हजार रुपयांची ग्रंथसंपदा भेट दिली. सदर कार्यक्रम प्रसंगी प्रा. विलास गायकवाड यांनी अध्यक्षीय सूचना मांडली. त्यास प्रा. डॉ. बाळासाहेब बाचकर यांनी अनुमोदन दिले. प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांनी प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय करून दिला. यावेळी संस्थेचे सचिव अॅड शरद सोमाणी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा.निजाम शेख यांनी केले तर, प्रा. डॉ.अशोक माने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सदर कार्यक्रमास ग्रामीण भागातील विविध मान्यवर, महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर सेवक, विद्यार्थी, विद्यार्थीनी आदि उपस्थित होते.
******************************************************
******************************************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******
******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******
- बातम्या व जाहिरातीसाठी
************-संपर्क-*************
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********** मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********** मो. 9273729867
*******************************************************
*******************************************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा