शीतलटाईम्स - प्रभारी प्राचार्य डॉ गुंफा कोकाटे यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रदान शीतलटाईम्स । प्रतिनिधी (बेलापूर)
शीतल टाईम्स । श्रीरामपूर प्रतिनिधी
प्रभारी प्राचार्य डॉ गुंफा कोकाटे यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रदान
शीतलटाईम्स । प्रतिनिधी (बेलापूर)
येथील बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांना पारनेर मतदार संघाचे आमदार लोकनेते निलेश लंके यांच्या शुभहस्ते राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. डॉ.कोकाटे यांना यापूर्वीही आठरा पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना अध्यापन क्षेत्रातील २१ वर्षांचा अध्यापन अनुभव असून गेल्या दोन वर्षांपासून त्या प्रभारी प्राचार्य म्हणून महाविद्यालयाचे प्रशासकीय काम पाहत आहेत. त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळाच्या व्याख्यात्या व ग्रंथ अन्वेषक आहेत. त्यांनी आतापर्यंत प्रशासकीय, शैक्षणिक, साहित्यिक, संशोधन, महिला सक्षमीकरण, सामाजिक, सांस्कृतिक या विविध क्षेत्रात केलेल्या या सेवाकार्याबद्दल त्यांचा उचित सन्मान केला गेला आहे. स्व.पै. किसनराव नाना डोंगरे बहुउद्देशीय संस्था व श्री. नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. या कार्यक्रमात धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाचे व कवीसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
आझादी का अमृत महोत्सवा निमित्त फिट इंडिया फ्रीडम रन स्पर्धा घेण्यात आल्या. पं. दीनदयाल उपाध्याय जयंतीनिमित्त मेगा रन स्पर्धा घेण्यात आल्या. मतदार जागृती अभियाना अंतर्गत निबंध व पोस्टर स्पर्धा घेण्यात अहिल्यादेवी होळकर जयंती व तंबाखूसेवन विषय दिनानिमित्त जिल्हास्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. गणेशोत्सवानिमित्त पर्यावरणावर ऑनलाइन घरगुती देखावा स्पर्धा घेण्यात आल्या. राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती व अमली पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त जिल्हास्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. या सर्व स्पर्धांचे पारितोषिक वितरण या सोहळ्यात करण्यात आले. पारनेरचे आमदार लोकनेते निलेश लंके, अभिनेते मोहनराव गटणे, नाना डोंगरे, डॉ.गुंफा कोकाटे यांच्या शुभहस्ते हे पारितोषिक वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात लोकनेते निलेश लंके यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सुरेखा गुंड, दिलीप पवार, रामदास भोर, संभाजीराजे दहातोंडे, प्रशांत गायकवाड, ज्ञानदेव पांडूळे, आबापाटील सोनवणे, सुनिल पैठणे, डॉ.शैलेंद्र भणगे, रुपाली जाधव आदिंच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य सोहळा संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन निमगाव वाघा येथिल डोंगरे बहुउद्देशीय संस्थेचे सर्वेसर्वा नाना किसन डोंगरे यांनी केले तर नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर वाचनालयातील सर्व सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
डॉ.कोकाटे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गणपतलाल मुथ्था, उपाध्यक्ष अशोकनाना साळुंके, सचिव शरद सोमाणी, सहसचिव दिपक सिकची, खजिनदार हरिनारायण खटोड, राजेंद्र खटोड, बापुसाहेब पुजारी, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन राजेश खटोड, भरत साळुंके, रविंद्र खटोड, शेखर डावरे, नारायणदास सिकची, सुरेश मुथ्था, प्रेमा मुथ्था, श्रीकृष्ण भालेराव, श्रीवल्लभ राठी, हरिश्र्चंद्र पाटील महाडिक, लीलावती डावरे, जेटीएसच्या उपप्राचार्य सुनिता ग्रोव्हर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
******************************************************
******************************************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******
******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******
- बातम्या व जाहिरातीसाठी
************-संपर्क-*************
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********** मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********** मो. 9273729867
*******************************************************
*******************************************************


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा