शीतलटाईम्स - शिक्षकी पेशा सांभाळून मी शेतकऱ्यांच्या सेवेत आलो - हवामान तज्ञ पंजाबराव डख शीतल टाईम्स । गळनिंब प्रतिनिधी

    


शिक्षकी पेशा सांभाळून मी शेतकऱ्यांच्या सेवेत आलो - हवामान तज्ञ पंजाबराव डख 

 शीतल टाईम्स । गळनिंब प्रतिनिधी




शिक्षकी पेशा सांभाळून मी शेतकऱ्यांच्या सेवेत आलो महाराष्ट्रातील अठरा हजार विनाअनुदानीत कला शाखेच्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आंदोलने केली. आठ आठ दिवस बिना भाकरीचे, फक्त पाणी पिऊन काढले. नवव्या दिवशी दवाखान्यात न्यावे लागले. शिक्षकी पेशा सांभाळून शेतकऱ्यांसाठी हे सर्व करत असताना मी बरंच काही शिकलो. तुम्ही खचून जाऊ नका! काळजी करू नका! पाऊस थांबणार आहे! तुमचे काहीही नुकसान होणार नाही. यापुढे दररोज थंडी वाढत आहे. इतका अचूक अंदाज दिला असताना या कालखंडात राज्यासह देशातील शेतकऱ्यांची 50 हजार कोटींचे सोयाबीन व कापूस इत्यादी पिके त्यांच्या खिशात घातली. म्हणूनच शिक्षकांना कमी लेखू नका. असे प्रतिपादन प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी केले. 



श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे अध्यापक संघटनेचे नेते महेश वडीतके यांच्या निवासस्थानी एका कार्यक्रमाच्या भेटीदरम्यान ते बोलत होते. श्री डख पुढे म्हणाले की, गेल्यावेळी महाराष्ट्र सरकारने १० कोटी सोयबीन पिकांसाठी त्याचे पॅकेज देऊ केले असता, त्यावेळी ५० हजार कोटी सोयाबीन शेतकर्‍यांच्या खिश्यात अचूक हवामानाच्या अंदाजानुसार नुकसान टळले होते. मी त्यावेळीच सगळ्याच शेतकर्‍यांना सांगत होतो की,११ते १६ ऑक्टोबर दरम्यानच वरुणराजा पडणार नाहीत. त्याच दरम्यानच आपणच शेतकर्‍यांनी पिके काढून घ्या सल्ला दिला. शेतकर्‍यांची उभी पिके वाचविली होती.



यावेळी प्रा.डाॅ.एकनाथ ढोणे, तुकाराम चिंधे, ह.भ.प.कोळपे महाराज, केंद्रप्रमुख सुर्यभान वडितके, ज्ञानदेव वडितके, आदीनाथ वडितके, राधाकृष्ण कोर्‍हाळे, संदिप शेरमाळे, संजय वडितके, सुयोग वडितके, कैलास विटनोर, सुनिल शिंदे, डाॅ.सुनिल चिंधे, बाळासाहेब वडितके, संजय बाहूले, मनोज तुपे, बापूसाहेब वडितके, दादा जाटे, दिपक जाटे, संजय कुदनर, गणेश देठे, साहेबराव भोसले, शिवाजी शिंदे, विशाल काळे, सुरेश पिलगर, आदींसह वडितके परीवारातील सदस्य उपस्थित होते. आभार प्रा.डाॅ.एकनाथ ढोणे सर यांनी मांडले.









******************************************************
******************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

 - बातम्या व जाहिरातीसाठी

 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

*******************************************************
*******************************************************




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव