शीतलटाईम्स - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह १० ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीत मोफत आरोग्य अभियानाचे आयोजन शीतलटाईम्स । अहमदनगर (प्रतिनिधी)

  


    शीतल टाईम्स । प्रतिनिधी




गरीब, गरजू नागरिकांची आरोग्य तपासणी करणे हा स्तुत्य उपक्रम - माजी मंत्री शिवाजी कर्डीले


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह


१० ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीत मोफत आरोग्य अभियानाचे आयोजन 


शीतलटाईम्स । अहमदनगर (प्रतिनिधी)


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त  'मातृशक्ती व स्वप्नपूर्ती' या आरोग्य अभियानाची सुरुवात करून कोरोना काळात प्रभागातील गरीब, गरजू नागरिकांची आरोग्य तपासणी करणे हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांनी केले. 


वैष्णव माता मंदिर, गणेश कॉलनी येथे या शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते झाले.  नगरसेविका पल्लवी जाधव यांच्या पुढाकारातून झालेल्या या आरोग्य तपासणी अभियान शुभारंभ कार्यक्रमास माजी महापौर बाबासाहेब वाकळे,  भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र भैया गंधे, सिटी केअर हॉस्पिटलचे डॉ. संदीप सुराणा, डॉ. जयश्री सुराणा, डॉ. मनोहर देशपांडे, नगरसेवक रवींद्र बारस्कर, उदय कराळे, स्वप्नील शिंदे, मनोज दुलम, मनोज ताठे  किरण बोरुडे अरुण शिंदे नगरसेविका सोनाबाई शिंदे, वंदना ताठे, आशा कराळे, लताताई शेळके, माजी उपमहापौर मालनताई ढोणे, स्वाती पवळे, कमल दालवळे,  अमृता पदके जनकल्याण रक्तपेढीचे डॉक्टर्स यांच्यासह इतर नगरसेवक, वैष्णव माता सेवा ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी व गणेश कॉलनीतील महिला व पुरुष यावेळी उपस्थित होत्या.


पुढे बोलतांना कर्डीले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस देशभरात मोठ्या उत्साहात व मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. मात्र नगरसेविका पल्लवी ताई जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस मोठ्या डामडौलात साजरा न करता प्रभागातील जेष्ठ नागरिक, महिला, पुरुष व लहान मुलांच्या विविध आरोग्य विषयक तपासणी शिबीराचे आयोजन करून साजरा केला. नेत्यांचा वाढदिवस कसा साजरा करावा याचा एक नवा आदर्श त्यांनी समाजासमोर ठेवला आहे. 


डॉ. संदीप सुराणा यांनी महिलांच्या आहाराविषयी, औषध उपचार, आयर्न आणि कॅल्शिअम याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, रविंद्र बारस्कर यांच्यासह उपस्थित इतर मान्यवरांचे भाषणे झाली. गणेश कॉलनीतील रहिवाशांनी उपस्थित सर्व मान्यवरांचा श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. 


या शिबिरात महिलांच्या आहाराविषयी मार्गदर्शन, औषध उपचार, आयर्न आणि कॅल्शिअम तपासणी मोफत करण्यात आली. तसेच रक्तदान शिबिर, महिलांकरिता मोफत हिमोग्लोबिन तपासणी व तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन यावेळी लाभले.


१० ऑक्टोबर रोजी सुरू झालेले हे आरोग्य अभियान १४ ऑक्टोबर रोजी दररोज सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत संपन्न होणार आहे. ११ ऑक्टोबर रोजी सिद्धिविनायक कॉलनी गणेश मंदिर, १२ ऑक्टोबर रोजी दुर्गा माता मंदिर अमित कॉलनी, १३ ऑक्टोबर रोजी शिव गणेश मंदिर, रासने नगर, १४ ऑक्टोबर रोजी आमदार हॉल, भुतकरवाडी येथे या अभियानाची सांगता होणार आहे. गरजु रुग्णांनी या अभियानाचा लाभ मोफत घ्यावा असे आवाहन यावेळी नगरसेविका पल्लवीताई जाधव यांनी केले.



  •  वैष्णव माता मंदिर, गणेश कॉलनी येथे नगरसेविका पल्लवीताई जाधव यांच्या पुढाकारातून झालेल्या या आरोग्य तपासणी अभियान शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी बोलतांना माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले समवेत डॉ. संदीप सुराणा, नगरसेविका पल्लवी ताई जाधव, डॉ. जयश्री सुराणा, डॉ. मनोहर देशपांडे, नगरसेवक रवींद्र बारस्कर, उदय कराळे व इतर (छाया :- ऋषिकेश राऊत, नगर).

  • वैष्णव माता मंदिर, गणेश कॉलनी येथे नगरसेविका पल्लवीताई जाधव यांच्या पुढाकारातून झालेल्या या आरोग्य तपासणी अभियान शिबिरात माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी आयर्न आणि कॅल्शिअम तपासणी केली. यावेळी डॉ. जयश्री सुराणा, डॉ. मनोहर देशपांडे, नगरसेवक रवींद्र बारस्कर आदी उपस्थित होते. (छाया :- ऋषिकेश राऊत, नगर)



******************************************************
******************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

 - बातम्या व जाहिरातीसाठी

 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

*******************************************************
*******************************************************




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव