शीतलटाईम्स - मंजूर घरकुलाचे काम पूर्ण होऊनही धनादेश देण्यास टाळाटाळ भीम गर्जना सामाजिक संघटनेच्या नेतृत्वाखाली लाभधारकांचे अमरण उपोषण शीतलटाईम्स । श्रीरामपूर प्रतिनिधी

  


    शीतल टाईम्स । प्रतिनिधी





मंजूर घरकुलाचे काम पूर्ण होऊनही धनादेश देण्यास टाळाटाळ ! 


भीम गर्जना सामाजिक संघटनेच्या नेतृत्वाखाली लाभधारकांचे अमरण उपोषण


शीतलटाईम्स । श्रीरामपूर प्रतिनिधी


 पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मंजूर असलेल्या घरकुल बांधकामासाठी धनादेश देण्यास अडथळे निर्माण करणाऱ्यांची चौकशी करून, दुसऱ्या टप्प्यातील चेक त्वरित मिळावा, या मागणीसाठी घरकुल लाभधारकांसह भीम गर्जना सामाजिक संघटनेचे पदाधिकारी  सोमवारपासून ( दि.११) नगरपरिषदेसमोर आमरण उपोषणास बसले आहे.



यासंदर्भात भीम गर्जना संघटनेच्या वतीने पालिका प्रशासनास निवेदनही देण्यात आले होते. शहरातील गोंधवणी रोड, नेहरूनगर येथील सचिन व नितीन बनकर यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकूल मंजूर होवून बांधकामास परवानगी मिळाली. त्यानुसार घरकुलाचे स्लॅबपर्यंतचे बांधकाम पूर्ण झाले असून सचिन व नितीन बनकर यांना प्रत्येकी ६० हजार रुपयांचे चेक मिळाले आहेत. त्यानंतर दुसरा चेक मिळेपर्यंतचे बांधकाम पूर्ण झालेले असून बांधकामाचे फोटो काढलेला आहे. सात दिवसात चेक निघेल, असे सांगितले होते. असेही निवेदनात नमूद केले केले आहे. 


दरम्यान, पुढील चेक न मिळाल्याने चेक मिळणेसाठी दोघांनीही अनेकवेळा संबंधित अधिका-याच्या भेटी घेतल्या असता त्यांनी चेक देण्याबाबत काही अडचणी सांगितल्याचे म्हटले आहे. तुम्ही जागा मोजून घ्या, जो आडवा येतो त्याला तुम्ही भेटा, समझोता करून घ्या,  अशा प्रकारे उडवाउडवीची उत्तरे देवून दुसरा चेक देणेस हरकत अडथळे करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. बनकर मागासवर्गीय समाजातील असल्याने त्यांना जाणूनबुजून त्रास दिला जात असल्याचेही निवेदनात म्हंटले आहे.


 निवेदनावर भीम गर्जना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष फिरोज पठाण, महाराष्ट्र अध्यक्ष शिवा साठे, राज्य सचिव विश्वास वाघमारे, कार्याध्यक्ष प्रवीण साळवे, श्रीरामपुर तालुका अध्यक्ष रफिक शाह, श्रीरामपूर शहराध्यक्ष फिरोज सय्यद आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.


******************************************************
******************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

 - बातम्या व जाहिरातीसाठी

 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

*******************************************************
*******************************************************




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव