शीतलटाईम्स - नवरात्री उत्सव बेलापुरात मोठ्या उत्साहात साजरा देवी तुळजा भवानीची सजावट करणाऱ्या मुक्ताबाई मगर यांना साडीचोळीची भेट शीतलटाईम्स । प्रतिनिधी

   

नवरात्री उत्सव बेलापुरात उत्साहात साजरा

देवी तुळजाभवानीची सजावट करणाऱ्या मुक्ताबाई मगर यांना साडीचोळी भेट



    शीतल टाईम्स । प्रतिनिधी



नवरात्री उत्सव बेलापुरात मोठ्या उत्साहात साजरा 


देवी तुळजा भवानीची सजावट करणाऱ्या मुक्ताबाई मगर यांना साडीचोळी  भेट


शीतलटाईम्स । प्रतिनिधी 


बेलापूर ।- येथे शिथील झालेल्या कोरोना निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर नवरात्र उत्सव भक्तिमय वातावरणात मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.



नवरात्रीमध्ये नऊ दिवस येथील तुळजाभवानी देवीला वेगवेगळ्या पद्धतीने नैवद्य दाखवून, रोज वेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा-अर्चना करण्यात आली. दरम्यान तुळजा भवानी देवीला नऊ दिवस वेगवेगळ्या रंगाची साडी नेसवण्याचे भाग्याचे पण तितकेच कलाकुसरीचे काम सामाजिक कार्यकर्ते गणेश मगर यांच्या मातोश्री सौ मुक्ताबाई मगर यांनी पार पाडले. 


कुठलेही प्रशिक्षण न घेतलेल्या मगरबाई यांनी रोज वेगवेगळी साडीची डिझाईन तयार करून अतिशय मनमोहक अशी देवीच्या नऊ रूपांची सजावट केली. हे नवतरुणींसमोर एक आव्हानच आहे. त्यांच्या या कामाबद्दल देवीच्या भक्तांमधून त्यांचे सर्वत्र कौतुक झाले. बेलापूर येथील सुवर्ण व्यापारी सीजीएम ज्वेलर्सचे मालक अनिल मुंडलिक यांनी मुक्ताबाई मगर यांना सुंदरशा साडीची भेट दिली आहे. देवीला नऊ दिवस साडी नेसवण्याचे भाग्य लाभले. यामुळे मनस्वी आनंद झाला असल्याच्या भावना यावेळी मुक्ताबाई मगर यांनी व्यक्त केल्या.


******************************************************
******************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

 - बातम्या व जाहिरातीसाठी

 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

*******************************************************
*******************************************************




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव