शीतलटाईम्स - बेलापूर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड ; नऊ लाखांचे वाटप
बेलापूर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड ; नऊ लाखांचे वाटप
शीतल टाईम्स । प्रतिनिधी बेलापूर
बेलापूर बु।।ग्रामपंचायत प्रशासनाने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याच्या वेतनासह दोन महिन्यांचे वेतन बोनस मिळून सुमारे नऊ लाखाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँकखाती वर्ग केली तसेच नविन गणवेशाचे वाटप करुन कर्मचाऱ्यांचा दिवाळी सण गोड केल्यची माहिती सरपंच महेन्द्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी दिली.
यासंदर्भात माहिती देताना त्यांनी सांगीतले की, गेली दोन वर्षे कोरोना महामारीचे संकटामुळे ग्रामपंचायत वसुलिला खिळ बसली होती. उत्पन्न घटल्याने ग्रामपंचायतीची आर्थिकस्थिती बिकट बनली होती. अशा स्थितीत काही व्यापारी बंधू, व्यावसायिक व नागरिकांनी वसुलीसाठी सहकार्य केले. त्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करणे ग्रामपंचायत प्रशासनाला शक्य झाले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,ज्येष्ठ नेते सुनिल मुथा,रणजीत श्रीगोड,जालिंदर कु-हे,शरद देशापांडे,विष्णुपंत डावरे,प्रभाकर कु-हे,भाऊसाहेब कुताळ,भास्कर बंगाळ,प्रकाश नवले,सुरेश कु-हे,प्रफुल्ल डावरे आदिंच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात बोनस व गणवेश वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी शरद नवले, सुनिल मुथ्था, विष्णुपंत डावरे रणजित श्रीगोड, जालिंदर कु-हे, प्रफुल्ल डावरे, सरपंच महेन्द्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे आदींची भाषणे झाली. कार्यक्रमास भाऊसाहेब कुताळ, भास्कर बंगाळ, प्रभाकर कु-हे, ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे, ग्रामपंचायत सदस्य तबसुम बागवान, स्वाती अमोलिक, चंद्रकांत नवले, मुश्ताक शेख, रमेश अमोलिक, बाबुलाल पठाण, प्रभात कु-हे, गणेश बंगाळ, दादासाहेब कुताळ, सागर कु-हे, महेश कु-हे, सद्दाम आतार, तसवर बागवान, विशाल आंबेकर, यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी आदि उपस्थित होते.
******************************************************
******************************************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******
******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******
- बातम्या व जाहिरातीसाठी
************-संपर्क-*************
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********** मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********** मो. 9273729867
*******************************************************
*******************************************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा