शीतलटाईम्स - जिल्ह्यातील बनावट खवा आणि पनीरचा जीवघेणा उद्योग बंद करा ! कारवाईसाठी हिंदू राष्ट्र सेनेची अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्तांकडे मागणी शीतलटाईम्स । अहमदनगर (प्रतिनिधी)


जिल्ह्यातील बनावट खवा आणि पनीरचा जीवघेणा उद्योग बंद करा ! 

कारवाईसाठी हिंदू राष्ट्र सेनेची अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्तांकडे मागणी

शीतल टाईम्स । प्रतिनिधी अहमदनगर

शहरासह जिल्ह्यात बनावट खवा आणि पनीरचा जीवघेणा उद्योग सुरु असून, यावर त्वरीत कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांना देण्यात आले. 

यावेळी हिंदू राष्ट्र सेनेचे शहर जिल्हाध्यक्ष परेश खराडे, अमोल शिंदे, दत्ता वामन, केशव मोकाटे, विनोद काशीद, दिनेश हिरगुडे, महेश आडेप, नरेश इप्पलपेल्ली, सिध्दार्थ जाधव, स्वप्निल लाहोर आदी उपस्थित होते.


दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या आठवड्यात शहरात मोठ्या प्रमाणात बनावट खवा पकडण्यात आला. मात्र  जिल्ह्यात विविध ठिकाणी बनावट खवा व पनीर मोठ्या प्रमाणात बनवून ते विक्रीस बाजारात येत आहे. या पदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असून, नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे. नागरिकांना एकप्रकारे विष खाऊ घातले जात आहे. यामुळे अनेक आजार उद्भवण्याची शक्यता असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. बनावट खवा आणि पनीरचा जीवघेणा उद्योग करणार्‍यांवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करावी, बनावट खवा आणि पनीरचा जीवघेणा उद्योग कायमचा बंद होण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.  



  • शहरासह जिल्ह्यात बनावट खवा आणि पनीरचा जीवघेणा उद्योग सुरु असून, यावर त्वरीत कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांना देताना हिंदू राष्ट्र सेनेचे शहर जिल्हाध्यक्ष परेश खराडे समवेत अमोल शिंदे, दत्ता वामन, केशव मोकाटे, विनोद काशीद, दिनेश हिरगुडे, महेश आडेप, नरेश इप्पलपेल्ली, सिध्दार्थ जाधव, स्वप्निल लाहोर आदी. 


******************************************************
******************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

 - बातम्या व जाहिरातीसाठी

 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

*******************************************************
*******************************************************




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव