शीतलटाईम्स - अपोलो हॉस्पिटल मुंबई यांचे तर्फे श्रीरामपुरात मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन इंडियन रेड क्रॉस सोसायटीचा उपक्रम शीतलटाईम्स । श्रीरामपूर (प्रतिनिधी)

अपोलो हॉस्पिटल मुंबई यांचे तर्फे श्रीरामपुरात मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन

इंडियन रेड क्रॉस सोसायटीचा उपक्रम

शीतल टाईम्स । श्रीरामपूर प्रतिनिधी

येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी श्रीरामपूर जिल्हा शाखेच्या वतीने रविवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 2.30 पर्यंत जैन स्थानक हॉल, शिवाजी रोड, श्रीरामपूर येथे अपोलो हॉस्पिटल मुंबई यांचे मोफत हृदयरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती सचिव सुनील साळवे यांनी दिली.
 

ज्या रुग्णांना दम लागणे, सतत खोकला येणे, छातीत दुखणे, श्वसन त्रास होणे, हृदयविकाराचा झटका येऊन गेलेला असणे, कोरोना झाल्यानंतर त्रास होणे अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी तपासणी करून घ्यावी असे आवाहन अपोलो हॉस्पिटलचे भारतातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर संजीव जाधव यांनी केले आहे.  डॉ.संजीव जाधव व त्यांची टीम रुग्णांची तपासणी करणार आहेत. त्यामध्ये शुगर, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, पी.एफ.पी, ई.सी.जी, बी.एम.आय आदी तपासण्या होणार आहेत. रुग्णांनी नाव नोंदणी करणे आवश्यक असून, जुने रिपोर्ट व सध्या घेत असलेली औषध माहिती सोबत आणणे. तपासणीला येताना मास्क लावूनच यावे तशी तपासणी होणार नाही. कोरोना नियमांचं पालन करावे तसेच आधार कार्डची झेरॉक्स आणावी. ख्यातनाम किर्तीचे डॉक्टर संजीव जाधव श्रीरामपूर येथे येत आहेत तेव्हा नागरिकांनी आवश्यक फायदा घ्यावा नागरिकांनी आपली नावनोंदणी नक्षत्र कलेक्शन महात्मा गांधी पुतळ्याजवळ,सेठी मेडिकल, महात्मा गांधी पुतळ्यासमोर, सतीश सायकल मार्ट, राधिका हॉटेल समोर, के.के.मोटर्स, बेलापूर रोड वेशीजवळ यापैकी एका ठिकाणी आपली नांव नोंदणी करावी. 

नागरिकांनी या सुवर्णसंधीचा फायदा घेण्याचे आवाहन चेअरमन प्रांताधिकारी अनिल पवार, व्हाईस चेअरमन तहसीलदार प्रशांत पाटील, सचिव सुनील साळवे, प्रवीण साळवे, भरत कुंकुलोळ, प्रमोद पत्की, गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, पोपटराव शेळके, चंद्रकांत परदेशी, के. के. आव्हाड,संतोष जाधव,श्रावण भोसले, सुरेश वाघुले, डॉ. शैलेंद्र भणगे, राजेंद्र केदारी, ऍड. पराग कारखानीस, श्रावण भोसले, नितीन राऊत,संजय टेकाळे, किरण सोनवणे, डॉ.बाळासाहेब सोनटक्के, साहेबराव रकटे, सुनील शेळके, बाळासाहेब पाटोळे, प्रकाश जाधव, अनिल जाधव, डॉ.संजय दुशिंग, नानासाहेब मुठे, सोपान नन्नवरे, कांतीलाल शिंदे, विनीत कुंकूलोळ, प्रेमनाथ सोनुने, महेंद्र काळंगे, मोहमद शेख, सुखदेव शेरे, सुरेश शेंडे, सोमनाथ परदेशी, विशाल निंभोरे, राजू कुलकर्णी, अण्णासाहेब राऊत, सुरंजन साळवे, उल्हास मराठे, उमेश अग्रवाल, संदीप छाजेड, बन्सी फेरवानी, अरुण कतारे,विश्वास भोसले,संदीप कालंगडे ,सौ.पुष्पा शिंदे, शोभा शेंडगे, सविता साळुंके, प्रा.मंगल दुशिंग, मंगल वाघ, प्रा.सुप्रिया साळवे, अपूर्वा वराळे, प्रा.डॉ.प्रतिभा विखे, वर्षा दातीर, डॉ.पूजा बोर्डे, डॉ मॅक त्रिभुवन, लहानु त्रिभुवन, संतोष अभंग, सुजय उपाध्ये, केशव धायगुडे, डॉ. भूषण साठे, दिलीप महाजनी, प्रतापराजे भोसले, डॉ. अश्विनी लिपटे, ऍड अश्विनी लबडे, सुषमा क्षत्रिय, प्रणिता भोसले, श्र्वेता साळवे, लता शेळके, अनुप्रीती पवार, सुनिता वढणे, माया चाबुकस्वार, युवा रेड क्रॉस सोसायटी आदींनी केले आहे.




****************************************************
****************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

 - बातम्या व जाहिरातीसाठी

 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

****************************************************
****************************************************




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव