शीतलटाईम्स - बेलापूरातील पुरातन इंद्रबिल्वेश्वर मंदिराच्या अध्यक्षपदी टाक तर सचिवपदी ॲड साळूंके यांची बिनविरोध निवड शीतलटाईम्स । बेलापूरः(प्रतिनिधी)
बेलापूरातील पुरातन इंद्रबिल्वेश्वर मंदिराच्या अध्यक्षपदी टाक तर सचिवपदी ॲड साळूंके यांची बिनविरोध निवड
शीतल टाईम्स । बेलापूर प्रतिनिधी
येथील पुरातन व पंचक्रोशीतील प्रसिध्द इंद्रबिल्वेश्वर मंदिराच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी कनजी टाक तर सचिवपदी ॲड विजय साळूंके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
इंद्रबिल्वेश्वर मदिरांच्या विश्वस्तमंडळाच्या निवडीसाठी जेष्ठ मार्गदर्शक व समाजसेवक सुवालाल लुंक्कड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलविण्यात आलेल्या बैठकीत अध्यक्ष व सचिवासहीत उपाध्यक्ष म्हणून वसंतराव म्हसे, सहसचिव म्हणून, कांतीलाल मुथा तर खजिनदारपदी केदारनाथ मंत्री यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सदर बैठकीत सर्वश्री शरद नवले, प्रा.हंबीरराव नाईक, अभिषेक खंडागळे , रविन्द्र खटोड, रविंद्र कोळपकर, प्रवीण लुक्कड, गोरख उंडे, सचिन चायल, राहुल दायमा, प्रमोद कर्डीले, महेश गोरे, शेखर चंगेडे, सुभाष देसर्डा, सुभाष सोमाणी, विशाल वर्मा, राजेश राठी यांची विश्वस्तपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. तर सर्वश्री सुवालालजी लुक्कड, रणजीत श्रीगोड, किशोर नवले, सुभाष राठी यांची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली.
या वेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी नविन पदाधिकारी व विश्वस्त मंडळाला शुभेच्छा देवुन मंदिराच्या तसेच घाटाच्या सुशोभीकरण व विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. या वेळी जनसेवा पतसंस्था व लोकवर्गणीव्दारे सुमारे चाळीस लाख रुपये रक्कम मंदिराचे जिर्णोध्दार कामी खर्च झाल्याची माहिती सुवालाल लुक्कड यांनी दिली. रणजीत श्रीगोड, रविन्द्र कोळपकर व प्रमोद कर्डीले यांनी भविष्यातील रुपरेषेबाबत माहिती दिली. मंदिराचा जिर्णोध्दार सोहळा लवकरच संपन्न होणार असल्याची माहिती नूतन अध्यक्ष कनजी टाक यांनी दिली. ॲड.विजय साळुंके यांनी उपस्थितांचे आभार मानले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा