शीतलटाईम्स - उपविभागीय पोलिस अधीक्षक संदीप मिटके यांच्या हस्ते शितल टाईमच्या दिवाळी अंकाचे प्रकाशनव
उपविभागीय पोलिस अधीक्षक संदीप मिटके यांच्या हस्ते शितल टाईमच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन
शीतल टाईम्स । प्रतिनिधी बेलापूर
सायं.दैनिक 'रामनगरी' आणि साप्ताहिक 'शीतल टाईम्स'च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिक्षक संदीप मिटके यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी यशवंत शल्यचिकित्सक डॉ.दिलीप शिरसाठ, जेष्ठ पत्रकार देविदास देसाई यांचेसह शीतल टाईम्सचे संपादक नरेंद्र लचके, उपसंपादक सुहास शेलार, जिल्हा प्रतिनिधी शकील शेख, रज्जाक पठाण आदी उपस्थित होते.
पुरस्कार प्राप्त लेखिका प्राध्यापक डॉक्टर गुंफा कोकाटे यांचे 'उजेडाचे दिवे', डॉक्टर सत्यपाल श्रीवास्तव यांची 'हरवून आल्यासारखं वाटतंय', सुहास शेलार यांची 'वाघिणीचे दूध', जहांगीर नाईकवाडी यांची 'देव एकाकी पडला', आदी कविता. ज्येष्ठ साहित्यिक अण्णा दगडे यांची 'मंत्र्यांची आहूती, हीच कामाची सद्गती', पुंडलीक गवंडी यांची 'स्वतंत्रतेचा बाणा', प्राध्यापक सुभाष लिंगायत यांचे 'चांदीची तार', अरविंद गाडेकर यांचे व्यंगचित्रे, डॉक्टर दादासाहेब गलांडे यांचे 'पहिले पाढे पंचावन्न', सौ अंजली सत्यपाल श्रीवास्तव यांचे 'परी राणीचे स्वप्न', प्रफुल्ल अनिल पिटके यांची 'अखेर जमलं' ही एकांकिका, लक्ष्मीकांत दाभाडकर यांच्या चारोळ्या, वात्रटिका व सौ. सुनिता इनामके यांचा कोरोना विषाणूवरील लेख आदींसह अनेक प्रसिद्ध लेखक, कवी, साहित्यिकांचे लेख, कथा, कविता, ललित, व्यंगचित्रे असे भरपूर मनोरंजनाने सजलेला 'शीतल टाईम्स'चा हा दिवाळी अंक आहे. हा अंक साहीत्यप्रेमी वाचकांनी अवश्य वाचावा असे नम्र आवाहन संपादक नरेन्द्र लचके, उपसंपादक सुहास शेलार यांनी केले आहे.
****************************************************
****************************************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******
******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******
- बातम्या व जाहिरातीसाठी
************-संपर्क-*************
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********** मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********** मो. 9273729867
****************************************************
****************************************************

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा