शीतलटाईम्स ।- श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांची ७५० वी जयंती उत्सवात साजरी! शीतलटाईम्स । श्रीरामपूर (प्रतिनिधी)
श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांची ७५० वी जयंती उत्सवात साजरी
शीतलटाईम्स । श्रीरामपूर (प्रतिनिधी)
येथील नामदेव शिंपी समाजाच्या वतीने संत नामदेव मंदिरात संत नामदेव महाराज यांची ७५० वी जयंती अतिशय उत्सवात संपन्न करण्यात आली. जयंतीच्या दिवशी सकाळी ६.२५ ला श्री व सौ. संतोषभाऊ गायकवाड यांच्या शुभ हस्ते विधीवत पूजा करण्यात आली. देवाचे देवपण हे मनुष्याच्या दुबळेपणात, त्याच्या व्याधींमध्ये आणि त्याच्यावर कोसळणाऱ्या संकटामुळे भयग्रस्त होणान्या त्याच्या मनात आहे, असा सिद्धान्त नामदेवांनी मांडला आहे.
देवा तुज आम्हीं दिधले थोरपण
पाहें हैं वचन शोधूनियां ॥
नसतां पतित कोण पुसे तूतें
सांदिस पडतें नाम तुझें ।
संत नामदेव जयंती उत्सवानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम साकर करण्यात आले. सकाळी काकड, आरती श्रींचा अभिषेक, श्री संत नामदेव महिला भजनी मंडळाचा हरिपाठ, भजनी मंडळाचे भजन, महाआरती आणि महाप्रदास असे विविध कार्यक्रम यावेळी उत्सहात संपन्न झाले.
यावेळी समाजाचे अध्यक्ष सुनिल खांबेकर, सचिव सुनिल हंगेकर, विनायकराव देव्हारे, गणेश देव्हारे, राजेंद्र भांबारे, उपाध्यक्ष किरण भांबारे, कार्याध्यक्ष कैलास खंदारे, ज्ञानेश्वर लचके, राजू लचके (कल्पक टेलर्स), अनंतराव पतंगे, गोविंद देव्हारे, नाना गुजर, पत्रकार नरेंद्र लचके, ए.डी.सी.सी. बँकेचे राजेंद्र लचके, सौ. सुमनताई नेवासकर, श्री. भास्कर खंदारे, सचिन सारंगधर, किरण भांबारे, अमोल भुसे, शाम सारंगधर तसेच नामदेव शिंपी समाजातील पदाधिकारी, सदस्य, महिला वर्ग आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत नामदेव महाराजाचे दर्शन घेण्यासाठी श्रीरामपूरातील भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष मारुतीशेठ बिंगले, अहमदनगर नामदेव प्रतिष्ठाणचे सचिव अशोक दिवे सर, शहर सरचिटणीस रवि पंडीत, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष साजिद शेख, युवा मोर्चा सचिव पंकज करमासे, भटक्या विमुक्त जाती संघटनेचे अध्यक्ष किरण रक्टे, सुरेश बडजाते आदींनी यावेळी नामदेव मंदिरात येऊन संत नामदेव महाराजाचे दर्शन घेतले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा