शीतलटाईम्स । रोटरीच्या वतीने शालेय मुलींना मासिक पाळी संदर्भात स्वच्छता व आरोग्याबाबत मार्गदर्शन शीतल टाईम्स । प्रतिनिधी अहमदनगर

    

रोटरीच्या वतीने शालेय मुलींना मासिक पाळी संदर्भात स्वच्छता व आरोग्याबाबत मार्गदर्शन

व्याख्यानात  उलगडले शारीरिक व मानसिक बदलाचे रहस्य व्याख्याना

 शीतल टाईम्स । प्रतिनिधी अहमदनगर 


रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनीच्या वतीने अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या शहरातील शाळांमध्ये वयात येणार्‍या किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी संदर्भात स्वच्छता व आरोग्याबाबत काळजी घेण्यासाठी व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानास शालेय विद्यार्थिनींचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, रुपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूल, अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडीयम स्कूल व भिंगार हायस्कूल या शाळेतील इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थिनींना या व्याख्यानात सहभाग नोंदवला. 

डॉ. बिंदू शिरसाठ यांनी मासिक पाळीत पाळण्यात येणारी स्वच्छता व आरोग्याबाबत घ्यावयाची काळजी संदर्भात मार्गदर्शन केले. शारीरिक व मानसिक बदलाचे रहस्य उलडून, रिअसेंबल कापडी पॅड घरी बनविण्याचे मुलींना प्रात्यक्षिक दाखविले. हे पॅड मुलींच्या आरोग्यासाठी उपयुक्त कमी खर्चात तयार होत असून, त्याचा पुनर्वापर करता येत असल्याने पर्यावरणासाठी देखील उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी रोटरी क्लब प्रियदर्शनीच्या अध्यक्षा शशी झंवर, सचिव देविका रेळे, लिटरसी डायरेक्टर प्रतिभा धूत, व्होकेशनल डायरेक्टर कुंदा हळबे, पर्यावरण डायरेक्टर माधुरी झंवर, जागृती ओबेरॉय, प्रकल्प समन्वयक छायाताई फिरोदिया, आशाताई फिरोदिया उपस्थित होते.

इंटरनॅशनल डे ऑफ गर्ल चाईल्ड निमित्त किशोरवयीन मुलींमध्ये जागृकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. दिवाळीनंतर शाळा सुरु झाल्यावर हा उपक्रम सुरु राहणार आहे. व्याख्यान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका योगिनी क्षीरसागर, गितांजली भावे, उज्वला भंडारी, वैशाली वाघ, जयश्री तोकशिया, सौ.मुळे यांनी परिश्रम घेतले.



  • रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनीच्या वतीने अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या शहरातील शाळांमध्ये वयात येणार्‍या किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी संदर्भात स्वच्छता व आरोग्याबाबत काळजी घेण्यासाठी घेण्यात आलेल्या व्याखानास किशोरवयीन मुलींचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.  
******************************************************
******************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

 - बातम्या व जाहिरातीसाठी

 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

*******************************************************
*******************************************************




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव