शीतलटाईम्स - बेलापुरात आधार कार्ड, मोबाईल नंबर, ईमेल आयडी लिंकिंग व आधार कार्ड दुरुस्ती शिबीर गंगाधर शास्त्री साळुंके सामाजिक प्रतिष्ठान व बेलापूर पोस्ट ऑफिस यांचा संयुक्त उपक्रम शीतलटाईम्स । बेलापूर प्रतिनिधी
बेलापुरात आधार कार्ड, मोबाईल नंबर, ईमेल आयडी लिंकिंग व आधार कार्ड दुरुस्ती शिबीर
गंगाधर शास्त्री साळुंके सामाजिक प्रतिष्ठान व बेलापूर पोस्ट ऑफिस यांचा संयुक्त उपक्रम
शीतल टाईम्स । बेलापूर प्रतिनिधी
गंगाधर शास्त्री बद्रीनारायण साळुंके सामाजिक प्रतिष्ठान बेलापूर बुद्रुक आणि पोस्ट ऑफिस बेलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवार दिनांक 13 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत साळुंके बिल्डिंग आझाद मैदान ग्रामपंचायत समोर बेलापूर बुद्रुक येथे आधार कार्ड मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी लिंक करणे व आधार कार्ड दुरुस्ती करणे साठी शिबिर आयोजित करण्यात असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या वतीने अॅड. अजिंक्य साळुंके आणि अॅड. मयूर साळुंके यांनी दिली आहे.
शिबिरा बाबत अधिक माहिती देताना अॅड. साळुंके म्हणाले की अनेक शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड ला मोबाईल नंबर तसेच ईमेल आयडी लिंक असणे गरजेचे आहे तसेच अनेक नागरिकांच्या आधार कार्ड मध्ये नाव पत्ता यामध्ये चुका झाल्या असल्याने त्या चुका दुरुस्त होणे गरजेचे आहे यासाठी गंगाधरशास्त्रीजी बद्रीनारायणशेठ साळुंके सामाजिक प्रतिष्ठान व पोस्ट ऑफिस बेलापूर बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने सदरील शिबिराचे आयोजन केले गेले आहे. सदर प्रतिष्ठानच्या वतीने यापुढेही बेलापूर व परिसरात सामाजिक कामे करण्याच्या मानस अॅड. साळुंके यांनी व्यक्त केला आहे.
तरी बेलापूर आणि पंचक्रोशीतील सर्वच आणि जास्त जास्त नागरिकांनी या सदरील कॅम्पचे लाभ घेण्याचे आवाहन प्रतिष्ठान तर्फे श्री. पुरुषोत्तम गंगाधर साळुंके, श्री. प्रताप गंगाधर साळुंके, श्री. प्रदीप गंगाधर साळुंके, अॅड. मयूर साळुंके, अॅड. अजिंक्य साळुंके,प्रज्वल साळुंके, सोहम साळुंके , संजय साळुंके ,पार्थ साळुंके तसेच सर्व साळुंके परीवारातर्फे करण्यात आलेला आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा