शीतलटाईम्स - श्रीरामपूर येथे 'त्या' विवाहितेची आत्महत्या नसून घातपात! चौकशी करुन आरोपींना कठोर शिक्षा देण्याची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी अहमदनगर /श्रीरामपूर प्रतिनिधी

    


श्रीरामपूर येथे 'त्या' विवाहितेची आत्महत्या नसून घातपात!

चौकशी करुन आरोपींना कठोर शिक्षा देण्याची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी

अहमदनगर /श्रीरामपूर प्रतिनिधी 

शीतल टाईम्स

येथे विवाहितेची आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप करुन या प्रकरणी चौकशी करुन पीडितास न्याय मिळण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी या मागणीचे निवेदन पोलीस अधिक्षक कार्यालयात दिले. तसेच नाशिक जिल्हाध्यक्षा भावनाताई हागवणे यांनी देखील विशेष पोलीस महानिरीक्षकांना निवेदन दिले.

श्रीरामपूर येथे 22 ऑक्टोंबर रोजी माधुरी उमेश बोराडे या नवविवाहितेने पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे स्वरुप देण्यात आले आहे. मात्र ही आत्महत्या नसून, विवाहित महिलेचा घातपात करण्यात आला आहे. असे निवेदनात म्हटले आहे. धामणगाव (ता. इगतपुरी, जि. नाशिक) येथील माधुरीचे लग्न 27 नोव्हेंबर 2020 रोजी उमेश बोराडे या युवकाशी झाला होता. खाजगी नोकरीवरुन बदली झाल्याने नवीन दांम्पत्य श्रीरामपूर (जि. अहमदनगर) येथे राहण्यास आले. लग्नानंतर उमेशने फ्लॅट घेण्यासाठी माहेरुन पैसे आनण्यासाठी आपल्या पत्नीस त्रास देण्यास सुरुवात केली. विवाहितेचे मानसिक व शारीरिक छळ करुन मारहाण करण्याचा प्रकार सुरु होता. तसेच उमेशचे विवाहबाह्य संबंध असल्याने तो पत्नीचा छळ करत होता. माधुरी ही उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची गोल्ड मेडल मिळवलेली अतिशय हुशार विद्यार्थिनी होती. तसेच तिने एमपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी देखील सुरु केली होती. मात्र तिचा घातपात करण्यात आला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.




महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार वाढत आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होत असताना, आरोपी मोकाट फिरत आहे. ही प्रकरणे गांभीर्य हाताळून आरोपींना कठोर शिक्षा झाल्यास अशा घटनांना अळा बसणार आहे. श्रीरामपूर येथील नवविवाहितेला न्याय मिळण्यासाठी या प्रकरणी चौकशी करुन आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा  पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याच इशारा देण्यात आला आहे.

****************************************************
****************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

 - बातम्या व जाहिरातीसाठी

 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

****************************************************
****************************************************




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव