शीतलटाईम्स - देसाई परिवाराकडून माऊली वृद्धाश्रमास दिवाळी फराळाचे वाटप वृध्दाश्रमास मदत करण्याचे आदिनाथ झुरळे यांचे अवाहन शीतलटाईम्स । बेलापुर (प्रतिनिधी)


देसाई परिवाराकडून माऊली वृद्धाश्रमास दिवाळी फराळाचे वाटप 

वृध्दाश्रमास मदत करण्याचे आदिनाथ झुरळे यांचे अवाहन

शीतल टाईम्स । श्रीरामपूर प्रतिनिधी

आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून सुभाष वाघुंडे यांनी अनाथ मातापित्यासाठी वृध्दाश्रम काढुन त्यांची सेवा सुरु केली असुन त्यांच्या कार्यास समाजाने हातभार लावावा असे अवाहन अशोक कारखान्याचे संचालक आदिनाथ झुरळे यांनी केले.
 

श्रीरामपुर येथील माऊली वृध्दाश्रमास पत्रकार देविदास देसाई व देसाई परिवाराच्या वतीने फराळ वाटप करण्यात आला त्या वेळी झुरळे बोलत होते. या वेळी अशोकचे संचालक अभिषेक खंडागळे, भाऊसाहेब वाघमारे, देविदास देसाई, सौ.प्रतिभा देसाई उपस्थित होते. या वेळी माहीती देताना वृध्दाश्रमाचे संस्थापक सुभाष वाघुंडे यांनी कर्ज काढुन हा वृध्दाश्रम सुरु केल्याचे सांगुन हे समाजकार्य करताना आजपर्यत आलेले अनेक हृदयद्रावक प्रसंग कथन केले त्यामुळे उपस्थित सर्वांनाच गहीवरुन आले.

या वेळी अशोकचे संचालक व बेलापुरचे उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनीही सुभाष वाघुंडे यांच्या समाजकार्याचा गौरव करुन सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अश्वासन दिले या वेळी देविदास देसाई भाऊसाहेब वाघमारे आदिनी मनोगत व्यक्त केले या वृध्दाश्रमात पंधरा वयोवृध्द आजी आजोबा राहत असुन लोकांनी दिलेल्या लोक वर्गणीवरच हा आश्रम सुरुअसल्याचे वाघुंडे यांनी सागुंन उपस्थितांचे आभार मानले.



****************************************************
****************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

 - बातम्या व जाहिरातीसाठी

 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

****************************************************
****************************************************

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव