शीतलटाईम्स - वीर लहुजी वस्ताद साळवे जयंतीनिमित्त भाजपाच्यावतीने अभिवादन लहुजी वस्ताद यांनी स्वातंत्र्य क्रांतीची ज्योत पेटवली - चंद्रकांत पाटोळे. शीतलटाईम्स । अहमदनगर (प्रतिनिधी)

वीर लहुजी वस्ताद साळवे जयंतीनिमित्त भाजपाच्यावतीने अभिवादन

लहुजी वस्ताद यांनी स्वातंत्र्य क्रांतीची ज्योत पेटवली - चंद्रकांत पाटोळे.

शीतल टाईम्स । अहमदनगर प्रतिनिधी

मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी’ अशी प्रतिज्ञा घेऊन वीर लहुजी वस्ताद यांनी इंग्रजांविरुद्ध लढा देवून  स्वातंत्र्य क्रांतीची ज्योत पेटवली. इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी अनेक क्रांतीकारक तयार केले व तरुणांना युद्धकलेचे शिक्षण देऊन स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान दिले. व अनेक स्वातंत्र्यसेनानी लहुजीं यांच्या आखाड्यात युद्धकलेचे शिक्षण घेतले. व त्यांचे कार्य इतिहासात अजरामर असेच आहे. त्यांचे कार्य पुढील पिढीला समाजाण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याची गरज आहे. त्यांची प्रेरणा घेऊन देशासाठी आपणही योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन भाजपाचे अनुसूचित जातीचे शहर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटोळे म्हणाले.

वीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त भाजपाच्यावतीने सिद्धार्थनगर येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, अनुसूचित जातीचे शहर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटोळे, मनेष साठे, कुसूमताई शेलार, सुवेंद्र गांधी, अ‍ॅड.विवेक नाईक, डॉ.ज्ञानेश्वर दराडे, सुमित बटुळे, अशोक भोसले, नितीन जोशी, प्रशांत मुथा, संतोष शिरसाठ, रोहन शेलार, नितीन चाबुकस्वार, टिम्स गायकवाड, भरत गायकवाड, गौतम कांबळे, अ‍ॅड.किरण भिंगारदिवे, अ‍ॅड.अभिजित अडागळे, संतोष पाटोळे आदि उपस्थित होते.


दलित महासंघाच्या वतीने क्रांतिवीर लहुजी साळवे यांची 227 वी जयंती साजरी

शीतलटाईम्स । अहमदनगर (प्रतिनिधी)

दलित महासंघाच्या वतीने क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या 227 व्या जयंतीनिमित्त सिद्धार्थनगर येथील त्यांच्या पूर्ण कृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ सुलाखे पाटील, जिल्हा अध्यक्ष संजय चांदणे, शहर अध्यक्ष विशाल भालेराव, प्रेरणा विधाते, स्वप्नील चव्हाण, निलेश थोरात, राजू रोकडे, कडूबाबा लोंढे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हा अध्यक्ष संजय चांदणे म्हणाले की विर लहुजी साळवे यांनी इंग्रजांविरुद्ध लढा देऊन स्वातंत्र्य क्रांतीची मशाल पेटवली इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी मजबूत क्रांतिकारक निर्माण केले व तरुणांना युद्धकलेचे शिक्षण घेऊन स्वातंत्र्य लढ्यात मोठा योगदान दिलेला आहे अशा थोर व्यक्तिमत्त्वाच्या जयंतीनिमित्त दलित महासंघाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.



****************************************************
****************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

 - बातम्या व जाहिरातीसाठी

 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

****************************************************
****************************************************

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव