शीतलटाईम्स - "असेल दृष्टि तर दिसेल सृष्टि" वासन टोयोटाच्या वतीने शुक्रवारी मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन शीतलटाईम्स । अहमदनगर(प्रतिनिधी)

"असेल दृष्टि तर दिसेल सृष्टि"

वासन टोयोटाच्या वतीने शुक्रवारी मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

शीतलटाईम्स । अहमदनगर(प्रतिनिधी)

दृष्टीदोष असलेल्या गरजूंसाठी वासन उद्योग समूहाचे चेअरमन विजयजी वासन यांच्या मार्गदर्शनाखाली  शुक्रवार दि. 26 नोव्हेंबर रोजी मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबीराचे उद्घाटन केडगाव एमआयडीसी येथील वासन टोयोटा शोरुम येथे आमदार अरुणकाका जगताप व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जनक आहुजा यांनी दिली. 

असेल दृष्टि तर दिसेल सृष्टि हे ब्रीदवाक्य घेऊन वासन टोयोटा अहमदनगर व के.के. आय बुधराणी हॉस्पिटल (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने गरजूंसाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत शिबिर होणार असून, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून टोयोटा, किर्लोस्कर मोटर्सचे फिल्ड ऑफिसर नोएल सलधाना उपस्थित राहणार आहेत. मोतीबिंदू असलेल्या रुग्णांना तपासणीनंतर शस्त्रक्रियेसाठी पुणे येथील बुधराणी हॉस्पिटल येथे पाठविण्यात येणार आहे. नगर ते पुणे जाण्याचा प्रवास व शस्त्रक्रियेचा खर्च मोफत राहणार आहे. बिन टाक्याचे ऑपरेशन केले जाणार असून, रुग्णांसाठी राहणे व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. शिबीरार्थींना नंबरचे चष्मे देखील अल्पदरात कार्यक्रम स्थळी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या शिबीरात जास्तीत जास्त गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन वासन टोयोटा परिवाराच्या वतीने करण्यात आले असल्याचे जालिंदर बोरुडे व अनिश आहुजा यांनी सांगितले.

शिबिरार्थींना येताना रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र व आधारकार्डची झेरॉक्स आणने आवश्यक आहे. नांव नोंदणीसाठी संपुर्ण शहरात विविध ठिकाणी 10 सेंटर ठेवण्यात आले असल्याचे यांचा संपर्क पुढीलप्रमाणे केडगाव- वासन टोयोटा (0241- 2351234), एमआयडीसी- हरजितसिंह वधवा (9423162727), तारकपूर- जयकुमार रंगलानी (9850166777), सावेडी- राहुल बजाज (9890671671), गुलमोहर रोड- डॉ. सुरेंद्र खन्ना (9011071154), कापड बजार- अर्जुन मदान (9422908441), भिंगार- दामोदर माखिजा (9860815800), पोखर्डी- जीत मोटर्स (8080529600), आनंदधाम- अमरजीतसिंह वधवा (9209361313), मार्केटयार्ड- कैलास नवलानी (9028174716).



****************************************************
****************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

 - बातम्या व जाहिरातीसाठी

 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

****************************************************
****************************************************

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव