शीतलटाईम्स - नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्या हस्ते इंजि.विशाल शिरसाठ यांचा सत्कार अभियांत्रिकी पदविकेत केले दैदिप्यमान यश संपादन शीतल टाईम्स । प्रतिनिधी प्रतिनिधी

नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्या हस्ते इंजि.विशाल शिरसाठ यांचा सत्कार

अभियांत्रिकी पदविकेत केले दैदिप्यमान यश संपादन 

 शीतल टाईम्स । प्रतिनिधी प्रतिनिधी

येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार रमेश शिरसाठ यांचे चिरंजीव इंजि.विशाल शिरसाठ यांचा श्रीरामपूर नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. इंजि.विशालने सिव्हिल इंजिनिअरिंग या पदविका अभ्यासक्रमात उत्कृष्ट गुण संपादन करुन उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा हा सत्कार करण्यात आला.

इंजि.विशाल हे सुप्रसिद्ध आर्किटेक मा. सुभाषराव फेगडे यांच्या मे.सुभाष फेगडे अँड असोसियटस् या नामांकित फर्ममध्ये गत अनेक वर्षांपासून सेवेत कार्यरत आहे.


अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी प्रथमतः बांधकाम क्षेत्राशी निगडीत असलेले एम. सी. व्ही. सी.कन्स्ट्रक्शन सुपरवायझर नामक आपले शिक्षण पुर्ण केले तद्नंतर डिप्लोमा इन सिव्हील इंजिनिअर या पदविकेचे पुढील शिक्षण पूर्ण केले. इंजि.विशाल त्यांना याकामी इंजि.सुभाषराव फेगडे, अजितदादा पवार पॉलिटिक महाविद्यालयाचे अनिल गीते सर, खिल्लारी सर, ज्येष्ठ बंधू पत्रकार अमोल शिरसाठ यासोबतच सामाजिक कार्यकर्ते तथा समता फाऊंडेशनचे अध्यक्ष शौकतभाई शेख यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले, मनात जिद्द, चिकाटी आणि काही तरी करुन दाखविण्याची धमक असल्यास मनुष्य सहजरीत्या कठिण परिस्थितीवर देखील हमखास यशस्वीरित्या मात करु शकतो हेच यानिमित्ताने दिसून आले.


कॉलेजला जाण्या आधी आणि कॉलेजमधून आल्यानंतर त्यावर आपला होमवर्क देखील पुर्ण करत शिवाय आपले दैनंदिन कामांत वेळेचे बंधन पाळत इंजि. विशालने आपल्या माता-पित्यांचे केवळ स्वप्नच नव्हेतर आपल्यासह त्यांच्या सन्मानात मानाचा मोठा तुराच रोवला आहे, त्यांनी संपादक केलेल्या या दैदिप्यमान यशाबद्दल श्रीरामपुर विधानसभा आमदार लहुजी कानाडे साहेब , आर्किटेक्ट.सुभाषचंद्र फेगडे सर, आर्किटेक्ट इंजिनीअर असोसिएशनचे अध्यक्ष इंजि. के.के.आव्हाड सर, मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, समता फाऊंडेशनचे शौकतभाई शेख, महाराष्ट्र वडार समाज सेवा संघाचे प्रदेश महासचिव रमेशराव जेठे (सर), समता कॉप्यूटर इन्स्टिट्यूटचे इंजि.मोहसिन शेख, समता आरटीओ ऑनलाईन सर्व्हिसेसचे सरताज शेख तथा सामाजिक, शैक्षणिक, पत्रकार आदी क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.




इंजि.विशाल शिरसाठ यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. युनुसभाई जमादार (हापीज सहाब) मा.उपनगराध्यक्ष रवींद्र गुलाटी, नगरसेवक हाजी मुख्तारभाई शहा, नगरसेवक राजेश अलघ, रईसभाई जहागीरदार, मा.अल्तमेशभाई पटेल, उम्मती फाऊंडेशन सोहेलभाई दारुवाला, तौफिकभाई, मा.नगरसेवक रजाकभाई शेख, तथा इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

******************************************************
******************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

 - बातम्या व जाहिरातीसाठी

 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

*******************************************************
*******************************************************




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव