शीतलटाईम्स - डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात दिवाळी अंकाचे प्रदर्शन शीतलटाईम्स । बेलापूर प्रतिनिधी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात  दिवाळी अंकाचे प्रदर्शन

शीतल टाईम्स । बेलापूर प्रतिनिधी

बेलापूर बु।। ग्रामपंचायत संचालित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात  दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका शितल गायकवाड यांच्या हस्ते, वाचनालयाचे नियमित वाचक शिवदास दायमा यांच्या उपस्थितीत करण्यात आले. 
 

दिवाळीनिमित्त वाचकांना दर्जेदार दिवाळी अंकाची मेजवानी वाचनालयाच्या माध्यमातून मिळणार आहे. बेलापूर बु!! ग्रामपंचायत संचलित डाॕ,बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयास दिर्घ परंपरा आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नामांकीत असे सदरचे वाचनालय मानले जाते. नविन पुस्तके व दिवाळी अंक खरेदीनंतर त्याचे वाचकांच्या माहितीसाठी प्रदर्शन भरविण्यात येते. 



यावर्षीही दर्जेदार व वाचकप्रिय दिवाळी अंकांची ग्रामपंचायत वाचनालयाने उपलब्धता केली आहे. या अंकाचे परंपरेनुसार प्रदर्शन भरविण्यात येवून त्याचे उदघाटन करण्यात आले. यावेळी सरपंच महेंद्र साळवी, ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे, ग्रंथपाल सौ.उज्वला मिटकर(साळुंके), जेष्ठ नेते भास्करराव बंगाळ, भाऊसाहेब कुताळ ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नवले, रमेश अमोलिक, रावसाहेब अमोलिक, ग्रामपंचायत कर्मचारी बाबासाहेब प्रधान, सचिन साळुंके आदीसह ग्रामस्थ  उपस्थित होते. या उपक्रमाचे वाचनप्रेमींनी स्वागत केले आहे.

****************************************************
****************************************************

   -  संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले  -

***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******

******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******

 - बातम्या व जाहिरातीसाठी

 ************-संपर्क-*************

✒️ मुख्य संपादक  - नरेंद्र लचके 

********** मो. 9225327176

✒️ उपसंपादक सुहास शेलर

********** मो. 8485867429

✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख

********** मो. 9273729867  

****************************************************
****************************************************

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेलापूर खुर्द येथील महिलेचा रेल्वेखाली सापडून मृत्यू शीतल टाइम्स प्रतिनिधी

शीतल टाइम्स //- तांत्रिक बिघाडामुळे रेशनधारक धान्यापासून वंचित मराठीत नोंद असलेल्या कार्डधारकांना अडचणी दोन दिवसांत तोडगा निघणार

शीतल टाइम्स //- गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून शेतकऱ्यावर हल्ला; उक्कलगावात तणाव