शीतलटाईम्स - मौजे खरवंडी कासार ग्रामस्थांच्यावतीने इब्राहिम बागवान (सर) यांचा सत्कार शीतलटाईम्स - श्रीरामपूर (प्रतिनिधी)
मौजे खरवंडी कासार ग्रामस्थांच्यावतीने इब्राहिम बागवान (सर) यांचा सत्कार
शीतल टाईम्स । प्रतिनिधी श्रीरामपूर
ओबीसी समुदायासह इतर अनेक उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शब्बीरभाई अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशन या राष्ट्रीय संघटनेच्या अहमदनगर जिल्हा सरचिटणीसपदी इब्राहिम बागवान (सर) यांची निवड झाल्याबद्दल जिल्हाभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे,श्री.बागवान (सर) हे आपल्या सेवेसाठी जरी श्रीरामपूर तालुक्यात असले तरी पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार हे त्यांचे मुळ गाव आहे, म्हणून खरवंडी कासार या त्यांच्या मुळ गावी वृध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब गोल्हार व खरवंडी कासारचे सरपंच प्रदीप पाटील आणि ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.सोबतच भाजपा महिला आघाडीच्या पाथर्डी तालुकाध्यक्ष तथा मा.पंचायत समिती सदस्या श्रीमती काशिताई गोल्हार यांनीही श्री.बागवान यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या,
यावेळी भाजपा युवा मोर्चा चे पाथर्डी तालुका सरचिटणीस महेश बोरुडे, खरवंडीचे सरपंच प्रदीप पाटील,सत्तारभाई बागवान,वि.का.सेवा सोसायटी संचालक बाबासाहेब बोरुडे, ज्ञानदेव ढोले,लक्ष्मण राऊत, मा.ग्रा.सदस्य दादा जाधव, मच्छिद्र जायभाये ,नितीन खेडकर, किरण केळगद्रे (सर), पिंनु अंदुरे ,आव्हाड (सर) महेश राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा