शीतलटाईम्स - संविधानाचे अर्थ समजून घेऊन विद्यार्थी घडवावेत- डॉ.मा.मा.जाधव शीतलटाईम्स । बेलापूर प्रतिनिधी
संविधानाचे अर्थ समजून घेऊन विद्यार्थी घडवावेत- डॉ.मा.मा.जाधव
शीतलटाईम्स । बेलापूर प्रतिनिधी
बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे कला व वाणिज्य महाविद्यालय बेलापूर प्राध्यापक प्रबोधिनी आयोजित व्याख्यानमालेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे अभ्यास मंडळाचे माजी चेअरमन, माजी सिनेट सदस्य आणि मराठी विभाग प्रमुख वसमत महाविद्यालय प्रो. डॉ.मा. मा.जाधव सरांनी "बुद्धीवंतांचा संवाद" या विषयावर प्राध्यापक प्रबोधिनीत मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय शिक्षण धोरण व अंमलबजावणी यावर चर्चा केली. नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्या. वैचारीक मतभेद असू शकतात पण माणसांची हत्या करणारी जमात किती हिंस्र असू शकते याचे कारण राजकारणाला विघातक वळण लागले असेही ते म्हणाले. अक्षरगाथा या नियतकालिकाचे योगदान त्यांनी विशद केले. विविध ठिकाणी परिषदा घेऊन परिवर्तनाची वाटचाल केली. बुद्धीवादी लोकांनी सामाजाला योग्य दिशा द्यावी. पुरोगामी विचारांचा पुरस्कार करावा. प्रत्येक नागरिकाने लोकशाहीची मुल्ये जतन करावीत. शिक्षकांनी संविधानाचे अर्थ समजून घेऊन विद्यार्थी घडवावेत असेही ते म्हणाले.
या पुढील काळात बेलापूर महाविद्यालय गुणवत्तेच्या व विकासाच्या बाबतीत अधिकाधिक प्रगती करेल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे यांनी प्रास्ताविक केले. प्रा.विलास गायकवाड यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गणपतलाल मुथ्था यांनी अतिथींचा सत्कार केला. डॉ.अशोक माने यांनी सर्वांचे आभार मानले. या उपक्रमास सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर सेवक उपस्थित होते

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा